कारंजा - सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा (लाड) जि.वाशिम येथे उप अभियंता पद मागील दोन महिन्यापासून रिक्त असल्यामुळे या पदावर तात्काळ नियुक्ती करणे तथा सा.बां.उपविभाग येथे यापूर्वी कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील केलेल्या बांधकामाची अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती यांचे मार्फत केलेल्या बांधकामाची खातेनिहाय चौकशी करून दोषी असल्यास नियमानुसार कारवाई करणे बाबतचे मागणसंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी मुख्य अभियंता सा.बा. प्रादेशिक विभाग अमरावती, अधीक्षक अभियंता सा.बा.मंडळ अकोला, कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग वाशिम तथा तहसीलदार कारंजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सा. बां.उपविभाग कारंजा (लाड) येथे सहाय्यक कार्यकारी अभियंता शुभम जोशी हे कार्यरत होते,त्यांची पदोन्नती होवून ते कार्यकारी अभियंता पदी सा. बां.विभाग,वाशिम येथे दोन महिन्यापूर्वी रुजू झाले. परंतू ते रुजू झाल्यानंतर कारंजा येथील उपअभियंता पद अद्यापपर्यंत रिक्त होते.रिक्त असलेल्या पदावर शासनाने दक्षता व गुणनियंत्रक मंडळ, अमरावती येथे कार्यरत असलेले उपअभियंता संजय कपाटे यांची स्थानांतरण सा.बां.उपविभाग, कारंजा (लाड) येथे करण्यात आले व ते रुजू झाले, रुजू झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन प्रशासकीय घडामोडी घडल्यानंतर त्यांना सा.बा.उपविभाग कारंजा येथे पदभार स्वीकारण्यास मनाई केली व त्यांची उपविभागात झालेली नियुक्ती रद्द करुन त्यांना पुनश्चझ दक्षता व गुण नियंत्रक मंडळ, अमरावती येथे रुजू होण्यात सांगितले व ते रुजू झाले. तेव्हापासून अद्यापपर्यंत उप अभियंता पद रिक्त आहे. त्यामुळे सा.बां.उपविभाग, कारंजा तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामाची गती मंदावली असून सुरु असलेले विकास कामे अंदाजपत्रकामधील बाबीनुसार व सा. बां. विभागाच्या माणके व विनिर्देशानुसार न करता ढोबळमनाने सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कारंजा तालुक्यातील शासनाच्या विविध लेखाशिर्षाखाली प्रस्तावित करण्यात आलेल्या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याची प्रक्रिया मंदावली असल्यामुळे तालुक्यामधील विकास कामे, मुलभूत सोयी सुविधेअंतर्गत रस्ते, पुल, इमारती, पुर हाणी येाजनेअंतर्गत खराब झालेले रस्ते, रोडसाईड ड्रेन इत्यादी विकासकामे खोळंबलेली आहे. प्रशासकीय कामानिमित्त कारंजा तालुक्यातून भेट घेण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना सहकार्य मिळत नसल्यामुळे अत्यंत त्रास होत आपण त्यांच्या तक्रारीचे निराकरण योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे उपरोक्त जनआक्रोष परिस्थिती लक्षात घेता उपअभियंता पद अद्यापपर्यंत रिक्त असल्यामुळे तात्काळ उपअभियंता पदी नियुक्ती करण्यात यावी.
तसेच उपकार्यकारी अभियंता शुभम जोशी यांची दोन महिन्यापूर्वी पदोन्नती होवून कार्यकारी अभियंता पदावर वाशिम येथे रुजू होवून ते कार्यरत आहे. परंतू सा.बा. उपविभाग कारंजा येथे त्यांच्या दालनात त्यांच्या नावाची पदासह नामफलक अद्यापपर्यंत काढण्यात आलेला नाही. तो सुध्दा ते कार्यरत नसल्यामुळे तात्काळ काढण्यात यावे.
उपकार्यकारी अभियंता शुभम जोशी हे कारंजा सा. बां. उपविभागात रुजू झाले तेव्हापासून कार्यमुक्त होईपर्यंत केलेल्या कारंजा-धनज रस्त्यांच्या डांबरीकरणासह तालुक्यातील संपूर्ण कामाची दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती यांचे मार्फत खातेनिहाय चौकशी करुन केलेल्या बांधकामामध्ये अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
कारंजा सा. बां. उपविभागात रिक्त असलेल्या उपअभियंता पदावर कारंजा तालुक्यातील मंदावलेली विकास कामे व जनतेला होणारा त्रास लक्षात घेता तात्काळ उपअभियंता पदावर नियुक्ती देण्यात यावी व उपकार्यकारी अभियंता शुभम जोशी हे रुजू झाले ते कार्यमुक्त होईपर्यंत पूर्ण झालेल्या बांधकामांची दक्षता व गुणनियंत्रक मंडळा अमरावती मार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर व कॉन्ट्रॅक्टदार यांचे वर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. दिलेल्या निवेदनानुसार लवकरात लवकर रिक्त असलेल्या उपअभियंता पदावर नियुक्ती देण्यात यावी व यापूर्वी कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता यांची खातेनिहाय चौकशी करुन नियमानुसार कारवाई करण्यात यावी व कारवाई न केल्यास पिपल्स रिपब्लिकन पार्टी कारंजाच्या वतीने विविध राजकीय, सामाजिक संघटनेशी चर्चा करुन सा. बा. उपविभाग कार्यालयासमोर जनहितार्थ तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. त्याबद्दलची माहिती पत्रकार परिषद घेवून तारीख व वेळ संबंधित विभागास कळविण्यात येईल असे निवेदनात नमूद केलेले आहे निवेदन देतेवेळी समाजसेवक चांदभाई मुन्नीवाले यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते..
मुख्य अभियंता सा.बा. प्रादेशिक विभाग अमरावती,अधीक्षक अभियंता सा.बा.मंडळ अकोला, कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग वाशिम यांना व्हाट्सअप द्वारे निवेदनाची फोटोसहव व्हिडिओसह निवेदनाची प्रत पाठविलेली असून अधीक्षक अभियंता यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली असता त्यांनी प्राप्त झालेल्या निवेदनातील नमूद बाबीवर तात्काळ कारवाई करणे बाबत संबंधित विभागाचा आदेश दिलेले आहे असे अवगत केले केले असून सा.बा.उपविभाग कारंजा येथे तात्काळ लवकरात लवकर उपअभियंता पदी नेमणूक करण्यात येईल असे सांगितले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....