वाशिम : आजकाल कामाच्या व्यापाने प्रत्येक तरुण मग्न आणि चिंताग्रस्त असतो.त्यामधून तणाव मुक्त व शांतता मिळण्यासाठी तो सतत विरंगुळा शोधत असतो.परंतु त्यासाठी कारंजा दारव्ह्याच्या मित्रमंडळींनी साधन निवडले ते पर्यटन सहलीचे.
व ह्या पर्यटनाकरीता कारंजाचे मेघराज जुमळे,चंद्रकांत सुरळकर, दारव्ह्याचे विवेक लांभाटे यांनी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात पौष महिन्या निमित्ताने श्रीक्षेत्र कळंबच्या चिंतामणी गणेशाचे दर्शन करून त्यांचे शुभाशिर्वाद घेऊन रोजच्या घाईगर्दीतील कामाच्या व्यापातून ताणतणाव मुक्त होण्याचा निर्णय घेतला.सोबतच ताणतणावातून मुक्त होण्यासाठी कोणत्याही दुर्व्यसनाच्या आहारी न जाता,आपल्या पर्यटनामधून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यातील, कळंब तालुक्यात असलेल्या ग्राम चापर्डा येथील मैत्र्येय मेडिकल मेडिटेशन मौनॉस्ट्री चापर्डा याच्या पवित्र ज्ञानभूमीला (गार्डन मेडिटेशनला) भेट देवून ताजेतवाणे,उत्साही,प्रफुल्लीत व आनंदी होण्याचा अनुभव घेतला.
पवित्र ज्ञानभूमी मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अशा बुद्धमुर्तीचे अभिवादन केले. बुद्ध वंदना केली. तसेच पूज्य भन्तेजी यांचे विचार ऐकले. या सुविचारी पर्यटनामुळे नवचैतन्य मिळाल्याची भावना मेघराज जुमळे,विवेक लांभाटे, चंद्रकांत सुरळकर,ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे इ. मित्रमंडळी व्यक्त करीत होते.