कारंजा :सर्व विद्युत ग्राहकांना सावध करतांना महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी संघर्ष समितीने म्हटले आहे की, विज ग्राहकांनी आपआपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत .कारण कि दि. ४-५-६ जानेवारी २०२३ रोजी
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप ग्राहकांना त्रास होईल अशा उद्देशाने बिल्कुल नाही. कर्मचारी अधिकारी यांना काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. परंतु फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायचा प्रयत्न असल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी संप असल्याचे संघर्ष समितीने म्हटले आहे. येणारे हे तीन दिवस त्रासदायक नक्कीच होतील असे सुद्धा त्यांनी सांगतिले व त्याबद्दल ग्राहकांचे दिलगीर असल्याचे सांगीतले. हा संप फक्त ग्राहकांकरिता असून उदा बि एस एन एल बुडण्यापूर्वी जीओ फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीडचा भरपूर डेटा पॅक देत होते मात्र आज रोजी कमी स्पीडचा डेटा पॅकला सुद्धा ७०० रुपये मोजावे लागतात. त्याप्रमाणे उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. कदाचित काही ग्राहक आमच्या सेवेमुळे दुखावलेले असतील ,वसुल्यामुळे नाराज असतील पण सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समिती ने विज ग्राहकांना केले सावध करतांना म्हटले आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.