गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या एका रानटी हत्तीचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील चिटकी गावाजवळील शेतात हा हत्ती मृतावस्थेत आढळला. रानटी हत्तीच्या मृत्यूची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
हत्तींचा एक कळप साधारण 2 वर्ष आधी ओरिसा राज्यातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालाय. याच कळपातील एक नर हत्ती (टस्कर) भरकटुन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात फिरत होता. हाच नर हत्ती आज सकाळी मृत आढळला. शेतकुंपणाला लावलेला करंट किंवा शेतपिकांवरील कीटकनाशक पोटात गेल्यामुळे या हत्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. वनपथक घटनेचा अधिक तपास करीत आहे.