कारंजा : अमरावती विधान परिषद मतदार संघाचा प्रचंड मोठा व्याप असतांनाही,या मतदार संघाचे अपक्ष (शिक्षक) आमदार,ॲड.किरणराव सरनाईक हे संपूर्ण महाराष्ट्रात एवढे लोकप्रिय कसे ? असा पक्ष अनेकांना पडत असतो.त्यांनी अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा ह्या पाचही जिल्ह्यात आपल्या चाहत्यांचा एवढा मोठा गोतावळा जमवीला की त्याला काही तोडचं नाही. जे शिक्षक,कर्मचारी किंवा नागरिक त्यांच्या कडे आपली समस्या घेऊन गेले,त्यांची स्वतःजातीने, शांततेने विचारपूस चौकशी करून त्या व्यक्तीचे काम ज्या अधिकार्याकडे असेल त्यांचेशी बोलून शहनिशा करून ते लगेच मार्गी लावतात. मतदारांचे प्रश्न विधान परिषदेत लक्ष्यवेधी मांडून सोडवितात. विधान परिषदेत 100 % उपस्थिती दर्शवितात. जेथे जेथे त्यांना कार्यक्रम निमित्ताने बोलविले जाते तेथे अचूक वेळेवर पोहोचतात.आपल्या मतदाराच्या सुख दुःखात सहभागी होतात. त्यामुळे ज्या ज्या मतदारांना त्यांचे अनुभव आले ते त्यांच्या बद्दल आपले मत स्पष्ट पणे व्यक्त करतांना खुल्या दिलाने व्यक्त होतांना सांगतात की, "आम्ही सर्व सामान्या मध्ये समरस होणारा असा आमदार आजता-गायत बघितला नाही.आणि बघणारही नाही.नुकतेच कारंजा येथील त्यांचे जुने जाणते कार्यकर्ता मित्र असलेल्या,नि:ष्पक्ष कार्यकर्ता तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांच्या मातोश्री श्रीमती दुर्गाबाई मधुकर कडोळे वाढदिवसाला,अँड.किरणराव सरनाईक यांनी भेट देवून,श्रीमती दुर्गाबाई कडोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रा.डॉ.कृष्णराव देशमुख, प्रदिप वानखडे,गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे संतोषराव पाचपोर, शेषराव पाटील इंगोले, सौ.सरलाताई इंगोले,संजय कडोळे इत्यादी उपस्थित होते.