वरोरा:--वरोरा येथील इंद्रप्रस्थ नगर येथील हनुमान मंदिरात दि १९ मार्च ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा च्या वतीनं पक्ष प्रवेश व महिला मेळावा घेण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा उपाध्यक्ष, मोरेश्वररावजी टेमुर्डे होते, अध्यक्षीय भाषणात पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाचे काम इमानी इतबारी करावे,मागील निवडणुकीत खासदारकीची तिकीट मिळवून देऊन निवडून आणण्यासाठी जवाबदारी आम्ही घेतली अशीच जवाबदारी या माणसाला पाडण्याची आम्ही घेतली असल्याचे त्यांनी म्हटले,या कार्यक्रमात असंख्य महिलांनी रा का पार्टीत मा ना शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांवर प्रेरित होऊन रा कॉ पक्षात प्रवेश केला या वेळी गौरव पुरस्कार प्राप्त सौ रंजना पारशिवे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित बेबीताई उईके जिल्हा अध्यक्ष महिला ,यांनी
वरोरा महिला शहर अध्यक्षपदी सौ सुनीताताई राऊत यांची नियुक्ती केली
या कार्यक्रमाला वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष जयंत टेमुर्डे, सत्कार मूर्ती रंजना पारशिवे, अशोकराव फोफळे, पदवीधर जिल्हा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ढेंगळे, जिल्हा सरचिटणीस राजू वरघणे, शहर अध्यक्ष बंडू भोंगाडे, महिला कार्याध्यक्ष महिला शहर मोनाली काकडे,उपस्थित होते,कार्यक्रमाचे
संचालन चंद्रकांत कुंभारे यांनी तर आभार प्रदर्शन विशाल पारखी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल पारखी तालुका अध्यक्ष,बंडू खारकर दिनेश मोहारे, युवक अध्यक्ष, अरुण सहारे नितीन समीरकिनाके, लताताई हिवरकर ,बंडू डाखरे ,जिल्हा कार्याध्यक्ष ओ बी सी सेल ,राजेंद्र ताजने ,जिल्हा अध्यक्ष अपंग सेल, अतुल वानखेडे ,सामाजिक न्याय सेल यांचे मोलाचे सहकार्य केले
आपल्या प्रतिक्रिया द्या....