वाशिम: (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)
महाराष्ट्रात आम आदमी पार्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पार्टीला विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टी नेते गोपाल इटलीया यांनी सदर समिती ची घोषणा करताना सांगितले की यापुढे महाराष्ट्रातील नव नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत आम आदमी पार्टीचे ध्येयधोरण तसेच दिल्ली आणि पंजाब मधील जनहिताची केलेल्या कामांची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवितील तसेच राज्याच्या प्रत्येक गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात लोकांच्या समस्या सोडविण्याचे आटोकाट प्रयत्न करतील भ्रष्टाचार विरोधात पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील अशीही गोपाल इटली यांनी सांगितले.
राज्य संघटनेच्या नियुक्तीत स्टेट कॅम्पेन इन्चार्ज रंगाराचुरे, उपाध्यक्ष विजयजी कुंभार, उपाध्यक्ष धनंजय शिंदे, संघटन सचिव अँड मनीष दामोदरराव मोडक, संदीप देसाई, अजित फाटके, नविंदर सिंग, अहतूवालिया, भूषण धकुळकर, हनुमंत चाटे, अजित खोत, रियाज पठाण, महिला आघाडी अध्यक्ष सीमा गुट्टे, युवा आघाडी अध्यक्ष मयूर दौंडकर, राज्य मीडिया प्रमुख चंदन पवार, समिती सदस्य देवेंद्र वानखडे, आणि संजय कोल्हे, यांची नियुक्ती करण्यात आली.
आप पार्टीला आणखी मजबूत बनविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यापासून तर तालुक्यापर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात नियुक्त दिल्या जातील असे गोपाल इटालिया यांनी सांगितले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....