वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : शिक्षणक्षेत्रातील नामांकित,लोकप्रिय व सुप्रसिद्ध असलेल्या स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे दरवर्षी प्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळा समिती अध्यक्षा माननीय सौ अनिताताई किरणरावजी सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते, देशभक्तीपर गीते,देशभक्तीपर नृत्य सादर केली.या कार्यक्रमाला प्राचार्य अरुणरावजी सरनाईक तसेच श्री शिवाजी किड्स च्या संचालिका सौ देवयानी ताई सरनाईक,उपमुख्याध्यापक शिंदे सर ,पर्यवेक्षक मिसर सर, शिवाजी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य रोकडे सर ,शिवाजी किड्सचे समन्वयक पुरोहित सर , शिवाजी किड्स मराठी सेमीच्या मुख्याध्यापिका मिसर मॅडम, शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक भास्कर सोनुने सर तसेच इतर अनेक इतर मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये अध्यापक, प्राध्यापक तसेच पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दीपक पाचरणे सर यांनी केले. असे वृत्त मिळाल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.