वाशिम / कारंजा : सत्य पचवायला आणि गुणीजनांचे कौतुक करायला फार मोठे मन लागते. मनुष्य हा धनवान नसला तरीही चालतो पण तो विचारानी दिलखुलास, मोठ्या मनाचा, मोकळ्या स्वभावाचा असला पाहीजे. परंतु आज आम्ही पहातो की, काही व्यक्ती समाजात डोमकावळ्या प्रमाणे वावरत असतात . त्यांचेकडे स्वतःला सिद्ध करण्याकरीता कोणतेही कतृत्व नसते. त्यांचे मोठे मन नसते. संकुचित, जातियवादी , कळलावू वृत्ती आणि लोकांना ब्लॅकमेल करून,धमक्या देवून त्यांची दिनचर्या सुरु असते. त्यामुळे अशा नालायक व्यक्तिंकडून चांगल्या वर्तवणुकीची अपेक्षा करणेच चुकीचे होय. आमच्या रक्तात पूर्वपासूनच माणुसकी असल्यामुळे आम्ही ऊसाला गोड आणि कारल्याला कडूच म्हणतो. समोरची व्यक्ती आमचे पेक्षा वयाने, अधिकाराने लहान असली तरी समोरच्या व्यक्तिंचा आम्ही आदरणीय, सन्माननिय म्हणूनच सन्मान करतो. कर्तव्यदक्ष व्यक्तिला कर्तव्यदक्ष आणि हजरजवाबी व्यक्तिला हजरजवाबीच समजतो. केव्हाही हेतुपुरस्परपणे किंवा अकारण कुणावरही टिकाटिप्पणी करून किंवा त्यांची निंदानालस्ती करून इतरांना दुखविण्याचे पाप करीत नाही. आम्ही भुकेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहाण जाणून आमच्या घासातला घास त्यांना भरविण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचे हेच कतृत्व साहजिकच काही ऊटपटांग जळतोळ्यांना सहन होत नाही. त्यांना त्यांचे खोटे वर्चस्व निर्माण करायचे असल्यामुळे त्यांचा टिकाटिप्पणीचा प्रपंच सुरु असतो. परंतु कारंजेकर अधिकारी - पदाधिकारी आणि राजकिय व्यक्तिंनी माझा दिर्घानुभव आणि माझे प्रामाणिक कार्य स्वतः जवळून पाहीलेले आहे . व त्यांना माहिती आहे की, "संजय कडोळे खुटे उपट खुटे गाढं" करणारा व संबंधितांना वेठीस धरणारा नाही तर तो हाडाचा समाजसेवक पत्रकार आहे. असे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक असलेले पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.