गुरुवारी कामरगाव येथे झालेल्या भयावह दुचाकी अपघातानंतर आज दुपारी दारव्हा रोडवर, सोमठाणा घाटात हातोला येथील युवकाचा मृत्यु झाला . त्याला काही तास उलटत नाहीत तोवर, मानोरा रोडवरील दापुरा येथे सुद्धा भयावह अपघात झाल्याची वार्ता येऊन धडकली आहे. चालू आठवड्यात संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील अपघाताची संख्या पहाता अतिशय दुःख होत असल्याचे भावनिक उद्गार काढतांना दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी, जिल्हयात महाराष्ट्र शासनचा वाहतूक विभाग आणि गृह खात्याचा पोलिस विभाग तसेच काही अपघातांना जबाबदार ठरू पाहणारा रस्ते निर्माण करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग आता आपल्या जिल्हयातील अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीची दखल घेऊन, रस्ते सुरक्षा अंतर्गत वाहनधारक तथा प्रवाशी यांचे समुपदेशन करून, स्वतःच्या जिविताचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करेल काय ? तसेच अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीची दखल घेऊन रस्ते दुरुस्ती करेल काय ? असा परखड सवाल करतांनाच समाजसेवक संजय कडोळे यांनी, "दुचाकी वाहन धारकांनी घरी तुमचे कुटूंब, तुमचे म्हातारे आईवडील, चिमुकली मुले वाट पहात आहेत . त्यामुळे त्यांच्या करीता तुम्हाला स्वतः चा जीव वाचवून, सुरक्षित घरी जायचे आहे . ही भावना लक्षात ठेवून, आपआपली वाहने शांती,संयम, सुरक्षितता बाळगून, वेगावर नियंत्रण ठेवून, तुमचा तोल कोठेही जाणार नाही . तसेच वाहन चालवीत असतांना तुम्ही निर्व्यसनी आहात. आजूबाजूचे तुम्हाला भान आहे. याचा विचार करून हळूवारपणे सुरक्षितच चालवावीत." वाहन चालवित असतांना दुसरे वाहन तर आपल्या अंगावर येणार नाही ना ? याची दक्षता घेऊनच चालविण्याचे भावनिक आवाहन समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे . तसेच अगदी कारंजा शहरातील मध्यवस्तीतूनही कर्कश हॉर्न वाजवित सुसाट वेगाने वाहने चालविणार्यांवर सुद्धा पोलिस स्टेशन आणि वाहतूक पोलिस यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, सि सी टि व्ही कॅमेर्या द्वारे लक्ष ठेवून नियम मोडणाऱ्या दुचाकी वाहनधारकांवर जास्तित जास्त कडक लक्ष्य ठेवून त्यांना कायदेशिर दंड आकारणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. आज रोजी खरोखर खाजगी रुग्नवाहिका चालविणार्या सच्च्चा समाजसेवकांना दररोजच्या अपघातामुळे जेवणाला बसल्या नंतर जेवण जात नाही. आणि रात्रीला झोपल्यानंतर झोप येत नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे . तर निदान आता तरी सावध व्हा ..! अपघात टाळा !! व सुरक्षित तुमचे घर गाठा !!! असे म्हणण्याची वेळ आलेली आहे .