न्यु लाईफ बहूउद्देशिय संस्था- ब्रम्हपुरी, आष्टेडू मर्दांनी आखाडा असोसिएशन- चंद्रपूर जिल्हा, व कलाकृती फाउंडेशन- नागभीड, यांच्या संयुक्त विद्यमाने 16/04/2023 रोजी रविवारला ब्रम्हपुरी शहरात भव्य रंगभरा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन सर्व विध्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि.26/04/2023 रोजी बुधवारला ब्रम्हपुरी येथील न्यु मदर पेट्स स्कुल येथे थाटामाठात संपन्न झाला.
सदर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.रश्मी पेशने मॅडम (संस्थापिका- मदर पेट्स CBSE स्कुल), तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी.पूनम कुथे मॅडम (युवा समाजसेविका), श्री.प्रितीश बुरले सर (नगरसेवक), श्री.गणेश लांजेवार सर (आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक), श्री.विवेक गोहणे सर (चित्रकला प्रशिक्षक), श्री.उदयकुमार पगाडे (युवा समाजसेवक), श्री.पृथ्वी कामडी सर (विंग्स अकॅडमी), श्री.केतन पेशने सर, श्री.महेश जिभकाटे सर, प्रा.सुयोग बाळबुद्धे, श्री.भूषण कुंभलवार, श्री.उपासराव समर्थ सर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला विशेष सहकार्य व मार्गदर्शन श्री.गणेश तर्वेकर सर (माजी उपाध्यक्ष- नगर परिषद, नागभीड) यांनी केले.
ही स्पर्धा 2 वयोगटात घेण्यात आली होती. गट- अ (वर्ग 5 ते 7) आणि गट- ब (वर्ग 8 ते 12).. ह्यामधील लहान वयोगटात प्रथम क्रमांक कुमारी.शर्वरी पडोळे, तर द्वितीय क्रमांक उत्कर्ष आंबोरकर, व तृतीय क्रमांक गौरव शेंडे, ह्या सर्वांना रोख रक्कम, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच मोठ्या वयोगटात प्रथम क्रमांक कुमारी.तेजस्विनी भाजीपाले, तर द्वितीय कुमारी.सौम्या भेंडारकर, व तृतीय कुमारी.अंजली प्रधान, ह्यांना रोख रक्कम, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ह्या संपूर्ण स्पर्धेत दोन्ही गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक आरती दोनाडकर, आदित्य शिंपी, अदिती वालदे, विक्रम भाजीपाले, मान्या अग्रवाल, विहान भोयर ह्या सर्वांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सर्वच सहभागी विध्यार्थ्यांना सुंदरसा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदयकुमार पगाडे यांनी केले, तर आभार सचिन भानारकर यांनी मानले. तसेच तनुजा इचकापे, तुषार वट्टी, पारस समर्थ इत्यादी लोकांनी विशेष मदत केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....