अकोला:- उमरी विभागात भारतीय जनता पार्टी च्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या गेल्या तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधे व आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. यावेळी अकोल्यातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सुजित सुनिल फोकमारे यांच्या गणराया ऑर्थोकेअर हाॅस्पिटल तर्फे १२०० रुपये खर्च असणारी हाडांची ठिसुळता तपासणी BMD मोफत करण्यात आली. ह्या शिबिरात डॉ. गोपाल गोंडचर, डॉ. तुषार चरखा, डॉ. दर्शन तातीया, डॉ. प्रशांत काटोले, डॉ. जयंत म्हैसने, डॉ. गौरव शिंदे, डॉ. सुनिल जाधव, डॉ. नरेश गोंड, डॉ. तुषार माळोकार, डॉ. निखिल बक्षी, डॉ. रविंद्र तेलकर, डॉ. जुगलकिशोर चितलांगे, डॉ. जुगल चिराणीया, डॉ. विक्रांत इंगळे आदी डॉक्टर मंडळींनी सेवा देऊन औषधोपचार केले.
याप्रसंगी खासदार अनुपजी धोत्रे, माजी महापौर विजयजी अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, संघटन सरचिटणीस संजयजी गोटफडे, सरचिटणीस ॲड. देवाशीषजी काकड, सरचिटणीस रमेशजी अलकरी, युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले, राज्य परिषद सदस्य डॉ.किशोर मालोकार, राजेंद्र गिरी, वैद्यकीय) आघाडी चे अध्यक्ष डॉ. राजु देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....