चंद्रपूर : परवानगी न घेता कोरोना रुग्ण भरती केल्याप्रकरणी आणि एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी चंद्रपूर येथील सरकार नगर येथे असलेल्या डॉ. रोहन आईचवार यांच्या सी. एच. एल. मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल विरोधात दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई आज बुधवारी (4 एप्रिल 2022) ला करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरातील आदर्श पेट्रोल पंप ते सरकार नगर रोडवर डॉ. रोहन आईचवार यांचे सी. एच. एल. मल्टीन्पेशालीटी हॉस्पीटल आहे. येथे कोव्हिड नियमानुसार शासनाकडून परवानगी न घेता कोरोना रुग्ण भरती केल्याची तक्रार प्राप्त झाली. शिवाय एका कोव्हिड रुग्णाचा मृत्यु देखील झाला. मात्र, याची माहिती प्रशासनाला देण्यात आली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात असा प्रकार घडल्याचे उघड झाले. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने रोहन आईंचवार यांच्या रुग्णालयात विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. 4 मे पासून दिनांक 11 मे पर्यंत CHL मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.