कारंजा : आगामी लोकसभा, विधानसभा,नगर परिषद तसेच महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र प्रभाग व विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून कांग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या व संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिने प्रयत्न होणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार कारंजा येथेही प्रभाग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. 9 ऑक्टोबर रोजी दारव्हा गेट जवळील राहुल नगर येथे सायंकाळी 7 वा. संपन्न होणाऱ्या या मेळाव्यात अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व जुनी पेन्शन साठी लढा देणारे धीरजजी लिंघाडे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव ॲड. दिलीपरावजी सरनाईक, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अमित भाऊ झनक यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीपभाऊ भोजराज मेळाव्याचे अध्यक्ष राहणार आहे.
या काँग्रेस मेळाव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजक शहर काँग्रेस कमिटीने केले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद अध्यक्ष संजय कडोळे यांना धडाडीचे काँग्रेस कार्यकर्ते,सेवादल काँग्रेस जिल्हा समन्वयक अँड संदेश जिंतुरकर यांनी कळविले आहे.