वाशिम: तरूण क्रांती मंच, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा समितीचे सरचिटणीस, केन्द्रशासन आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्काराचे मानकरी असलेले निलेश सोमाणी आणि त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी अॅड.सौ. भारती निलेश सोमाणी या उभयतांनी २४ फेब्रुवारी रोजी जनसेवक संजय आधार वाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित ५०१ लेकीबाळीचे सामुहिक विवाह कन्यादान सोहळयात, काही सेवेमध्ये सक्रिय योगदान दिले. सोबतच स्वत:च्या वाढदिवसानिमीत्त निलेश सोमाणी यांचेकडून या ऐतिहासीक सोहळयाकरीता सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेला २१ हजार रूपयांचा धनादेश आयोजक संजय वाडे व कार्याध्यक्षा खा. भावनाताई गवळी यांना प्रदान करण्यात आला.सदर कार्यक्रमात वाढदिवसानिमीत्त निलेश सोमाणी यांचा खा. भावनाताई गवळी, प्रा .जोगेंद्र कवाडे व संजय आधार वाडे यांच्याहस्ते संविधान भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर आचार्य विजयप्रकाश दायमा, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, आ. राजेंद्र पाटणी, आ. ऍड किरणराव सरनाईक, देवेंद्र खडसे पाटील,माजी आ.अॅड.विजयराव जाधव, पुरूषोत्तम राजगुरू, राजुभाऊ चौधरी , तेजराव वानखडे, जुगलकिशोर कोठारी समवेत मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी निलेश सोमाणी यांनी,"चला माझ्या लेकीच्या लग्नाला ही आगळी वेगळी संकल्पना घेवून वाडे परिवार व सर्वधर्मिय विवाह सोहळा समितीच्या पुढाकारातून पार पडलेल्या या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार बनण्याचे भाग्य व कन्यादान रूपी काही सेवा व रोख रक्कम मदत करण्याचे भाग्य मला मिळाले. सदर उपक्रमाने समाजाला दिशा देण्याचे काम केले असून या उपक्रमामध्ये सहभागी घेवून अनेक जबाबदार्या यशस्वीरित्या पार पडण्याचे पुण्य कार्यही करण्याचे समाधान प्राप्त झाले असल्याचे" प्रतिपादन सोमाणी दाम्पत्यांनी व्यक्त केले. असे वृत्त कार्यक्रमाला प्रत्यक्षदर्शी म्हणून उपस्थित असलेले साप्ता.करंजमहात्म्य परिवाराचे संजय कडोळे, डॉ ज्ञानेश्वर गरड, प्रदिप वानखडे यांनी कळवीले आहे.