एटापल्ली नजीकच्या बांडे नदीला पूर आला आहे. मार्गावरून वेगाने वाहत असलेल्या पाण्यात सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचे तीन अभियंत्यांनी महिंद्रा कॅम्पर वाहन पुरात टाकले.
पाण्याचा प्रभाव जास्त होता. त्यामुळे वाहन पाण्यात वाहून गेले. परंतु वृक्षाच्या साह्याने तीन अभियंते बाल बाल बचावले. बाहेर सुरक्षित बाहेर पडले. महिंद्रा कॅम्पर वाहन काही भागापर्यंत वाहून गेली. मोठी जीवितहानी टळली तरी अभियंताच्या हट्टामुळे एक भीतीचे वातावरण सध्या निर्माण झाले होते.