कारंजा : प्रजासत्ताक लोकशाहीचे आणि संविधानाचे महत्व समाजातील आबालवृद्धांना पटवून देण्याकरीता गेल्या सदोतिस वर्षापासून श्री नवलबाबा सामाजिक कार्य समिती वाल्मिकनगरचे अध्यक्ष श्याम घारू हे आपल्या समाज बांधव आणि सहकारी मित्र मंडळीच्या सहकार्यातून प्रजासत्ताक दिन घरोघरी राष्ट्रिय सण म्हणून आनंदोत्साहात साजरा करीत असतात. त्यानिमित्त दरवर्षी ते मान्यवरांच्या उपस्थितीत, अंगणवाडी कान्व्हेन्ट ते प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करून, त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता बक्षिसांची सुद्धा लयलूट करीत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वाल्मिक नगर येथे सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी ०७:०० वाजता, कारंजा येथील कॉग्रेस चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवी अर्जुनदास जवाहरमलाणी यांचे अध्यक्षतेखाली, कार्यक्रमाचे उद्घाटन, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ दिव्यांग समाजसेवक तथा लोककलावंत संजय कडोळे, प्रमुख पाहूणे संविधानाचे गाढे अभ्यासक व्याख्याते हंसराज शेंडे, माजी सरपंच प्रदिप वानखडे, कारंजा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले, शांतता कमेटी सदस्य महादेव ठोंबरे, वानखडे साहेब,डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त रामबकस डेंडूळे, ज्ञानेश्वर खंडारे यांच्या उपस्थितीत, लहान मुलामुलींची नृत्यस्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा प्रारंभ मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन व संत नवलबाबा, महर्षी वाल्मिक तसेच क्रांतिज्योती महात्मा फुले,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पूजन व हारार्पणाने करण्यात येऊन आयोजका कडून, प्रमुख पाहूण्यांच्या सत्काराने करण्यात आला.सदरहू स्पर्धेच्या गट-अ मध्ये, कु .अवनी अमित सावळे हिला प्रथम क्रमांक, भावेश घोगले यास द्वितिय क्रमांक, कु अवंतिका विक्की गोहर हिला तृतिय क्रमांक ; गट - ब मध्ये कु पाखी राहुल पातोडे हिला प्रथम क्रमांक, कु डॉली करण करोसे हिला द्वितीय क्रमांक, कु .आर्य भुपेन्द्र हरीहर, प्रोत्साहनपर कु शिवानी प्रकाश राठोड ; ग्रुप क मध्ये प्रथम क्रमांक कु दानवी पंकज जयदे, द्वितीय क्रमांक कु खुशी आनंद सारवान, तृतिय क्रं कु आराध्या संतोष गोहर, प्रोत्साहनपर पियुश अमोल गोडवे यास देण्यात आला. सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, गौरवपत्र व रोख बक्षिसे सुद्धा देण्यात आली. यावेळी हंसराज शेंडे यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले. दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी "श्यामजी घारू लहान मुलांच्या "कला अविष्कारात आनंद अनुभवत असल्याचे सांगून सदोतिस वर्षापासून त्यांचे लहानमुलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य, कोणत्याही शासकिय मदती शिवाय अविरतपणे सुरु असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले." याप्रसंगी अर्जुनदास जवाहरमलाणी, प्रदिप वानखडे , महादेव ठोंबरे ज्ञानेश्वर खंडारे , यांनी सुद्धा प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद केले.कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून रघुवंशी सर, चांभारे सर, संगेले सर यांनी जबाबदारी पार पाडली.
सदर्हु कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रमेश ढेणवाल, लिलाधर चव्हाण, संजय गोहर, संतोष घारू, भारत सारवान, गणेश बोयत, रोहीत गोहर, रणजीत जेथे, गोपिभैय्या डेंडूळे, नितीन नरवाले, धिरज पिवाल यांनी जबाबदारी पार पाडली. ह्या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन, संचलन व आभार प्रदर्शन श्री नवलबाबा सामाजिक कार्य समितीचे अध्यक्ष श्याम घारू यांनी केले. असे वृत्त पत्रकार रामेश्वर डेंडूळे यांनी कळवीले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....