कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): गेल्या जवळ जवळ पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकां पासून,शासनाने महामंडळावर, कार्यकर्त्याच्या नियुक्त्याच केलेल्या नाहीत.त्यामुळे सर्वच राजकिय पक्ष कार्यकर्त्याद्वारे वेळोवेळी नाराजीचा सूर आळवील्या जात असतो.त्यामुळेच महायुतीच्या शासनाने,महायुतीतील घटक पक्षांची समन्वय स्थापन करून, महामंडळावर नेते कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व देण्याकरीता 50-25-25 चा फॉर्म्यूला तयार केलेला असून,भाजपा-शिवसेना (शिंदे गट),-राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा तिनही पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये स्थान देण्याचे ठरवीले आहे.पूर्वी कारंजा येथील तत्कालिन आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांचेकडे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.मात्र गेल्या पाच वर्षापासून कोणत्याच महामंडळावर नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत.त्यामुळे आता महामंडळावर राष्ट्रवादी ( अजित पवार गट) यांचे कडून सईताई डहाके यांना महामंडळ मिळणार काय ? किंवा विद्यमान भाजपा आमदार किंवा मतदार संघातील त्यांच्या कार्यकर्त्याची दोन तिन महामंडळावर वर्णी लागणार ? याकडे मतदार संघातील मतदारांच्या नजरा लागलेल्या असल्याचे दिव्यांग जनसेवक ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे.