कारंजा: कारंजा येथे जिजाऊ ब्रिगेड कारंजा यांचे वतीने, पंचायत समिती सभागृह कारंजा येथे जिजाऊ -सावित्री जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी ,जिजाऊ जयंती 12 जानेवारी या जयंतीनिमित्त सावित्री -जिजाऊ वेशभुषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली,
आजच्या पिढीला राजमाता माॅसाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ओळख होऊन त्यांचे जीवनकार्याचे वाचन व्हावे यासाठी तसेच महिलांना त्यांचा त्याग, त्यांची क्षमता, त्यांच्यामधील निर्धार, साहस, सेवाभाव,संवेदनशीलता,न्यायता,इ.तसेच त्यांचे विचार,त्यांच्या कार्याची महिलांना जाणिव व्हावी आणि प्रेरणा मिळावी यासाठी व त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यासाठी जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती सविताताई अनिल मोरे, प्रमुख अतिथी शिवमती डाॅ.छायाताई चौधरी, शिवमती ॲड. शीतलताई कानकिरड , तालुका अभियान व्यवस्थापक उमेद अभियान शिवमती तृष्णा राजेंद्र ठाकरे उपस्थित होते, जिजाऊ-सावित्री प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली.
यावेळी उमेद अभियान प्रभागसंघ अध्यक्ष शिवमती उषाताई कडु, आशाताई अंबाळकर, छायाताई तिडके, तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती मंजुषाताई पिंपळशेंडे, प्रमिलाताई अंबाळकर, सुचिताताई बाजारे,हर्षाताई बागडे,स्वप्नाताई नाचोने,आरतीताई अघम, शीतलता कानडे, मनिषाताई राठोड,निशाताई बोरकर, वर्षाताई म्हातारमारे, विमलताई आवटे उपस्थीत होते.
जिजाऊ वेशभुषा स्पर्धेत चिन्मयी मांगलकर प्रथम तर सावित्रीबाई वेशभुषा स्पर्धेत प्रतिभाताई भेलोंडे द्वितीय क्रमांक आला.
वक्तृत्व स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक शिवमती मनिषा नगराळे ,खेर्डा बु,द्वितीय क्रमांक प्रतिभा भेलोंडे,मनभा तृतीय क्रमांक प्रमिला अंबाळकर ,प्रोत्साहनपर रंजनाताई राठोड, वडगाव ईजारा, आशाताई अंबाळकर, भडशिवणी , चिन्मयी मांगलकर कारंजा यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले, या स्पर्धेत शिवमती वनमाला नगरे, ललिताताई थोटांगे पिंप्रीमोडक, वीणाताई धाये सोहळ,जयश्रीताई खाडे,कामरगांव,सुलोचनाताई बोंद्रे धामणी, मीनाताई ढगे, शिलाताई उईके,पल्लवीताई ढेंगाळे, रजियाताई नंदावले,जयश्रीताई उजवणे,वाई छायाताई तिडके, उषाताई कडू, साक्षीताई इढोळे ,चिन्मयी मांगलकर व इतर सहभागी झाले होते,
जिजाऊ सावित्री यांचे विषयी प्रा.शिवमती सविताताई मोरे, डाॅ छाया चौधरी व ॲड शितलताई कानकिरड ,तृष्णाताई ठाकरे यांनी वैचारिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमती प्रणिता दसरे(समतादुत कारंजा), प्रास्ताविक शिवमती वर्षा शाहु भगत आभार शिवमती हर्षाताई प्रदीप बागडे यांनी केले, कार्यक्रमाला कारंजा शहरातील व ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आपल्या प्रतिक्रिया द्या....