पत्रकरितेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
त्यात संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, वाईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, यांचे अनुमतीने ही कार्यकारणी डिजिटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी जाहीर केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत पोंभुर्णा तालुका अध्यक्षपदी आशिष नैताम
यांची निवड करण्यात आली, आशिष नैताम हे लोकहित महाराष्ट्र या पोर्टल मिडियाचे तालुका प्रतिनिधी व मनविसे तालुका अध्यक्ष पदावर काम करीत असून या निवडी नंतर सर्वत्र स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.