शहरातील शिवाजीनगर येथील एका आरोपीसह तीन आरोपीनी वेगवेगळ्या ठिकाणाहून हांडेल लॉक नसलेल्या चार मोटरसायकल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी गाड्या विकण्याच्या दृष्टीने गाड्यांचे स्पेअर पार्ट व इंजिन काढून ग्राइंडर ने त्या इंजिनिवरील क्रमांक घासून लोखंडी स्पंचींग च्या साह्याने स्पंज करून विकले. या घटनेतील चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील शिवाजीनगर निवासी कुणाल हरिदास उईके वय 21 वर्षे, विजासन निवासी यश संजय कामतवार वय 19, बंगाली कॅम्प निवासी राहुल बावणे 21, विजासन निवासी प्रवीण बंडू मांढरे वय 23, असे आरोपिंची नावे असून पोलिसांनी मुद्देमालासह त्यांना अटक केली आहे..