नागभिड ----कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालय नागभीड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट आणि राजमाता जिजाऊ गाईड च्या पथकाकडुन गणेशोत्सवामध्ये संपुर्ण नागभीड शहरातील गणेश मुर्तीला अर्पण केलेले निर्माल संकलन करुन त्यापासुन सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिनांक 09/09/2022 रोज शुक्रवारला भगतसिंग चौक गणेश मंडळाकडुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तेव्हा स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचे वितरण उत्कृष्टपणे करुन योग्य अशी सेवा केली.त्यामुळे गणेश मंडळ तथा गणेश भक्ताकडुन स्काऊट आणि गाईड पथकाचे कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य .देविदास चिलबुले ,भगतसिंग गणेश मंडळाचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषद माजी सदश्य संजयजी गजपुरे व विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा, युवराज ईडपाचे यांनी स्काऊट मास्तर प्रा .किशोर नरुले व गाईड मास्तर कु.रजनी चिलबुले तथा सर्व पथकाचे अभिनंदन केले.या उपक्रमामध्ये शाळेचे शिक्षक अमोल रेवस्कर ,निखिल कोल्हे व सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिपाई वर्गानी सहकार्य केले.