वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.यावेळी उपस्थित जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधीक्षक राहूल वानखेडे, सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे, धर्मराज चव्हाण, शीतल पावडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सुध्दा पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.