आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री तथा शिवसेनेच्या वचनानुसार १ एप्रिल २०२० पासून २० टक्के वीज दर वाढवून देशात भाववाढ केली. याचा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.
शिवसेना कडून विधानसभा निवडणुकीत झालेली वचनपूर्ती सरकार असताना पूर्ण झाली नाही. त्याचप्रमाणे भाजपाकडून सुद्धा १०० ते २०० युनिट पर्यंत विज बिल माफ करू असे जाहीर केले परंतु आपले कर्तव्य विसरत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी वचन पूर्ण केले नाही किंबहुना याकडे लक्ष घालत नसल्यामुळे आज परिस्थिती बघता आपल्या राज्यात तयार होणारी विज १२ ते १८ रूपये दर वाढवून शासनाने व प्रशासनाने जनतेचे अक्षरशः कंबरडेच मोडले. त्यासाठी आज मुख्यमंत्री यांना तहसीलदार ब्रम्हपुरी मार्फत दिलेल्या निवेदनात मागण्या पूर्ण व्हाव्यात या करीता आम आदमी पार्टी ने निवेदन दिले.
निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टी ब्रम्हपुरी चे कार्यकर्ते दिलीप प्रधान, नावेद खान, राहुल सोनटक्के, रवी रामटेके, वैशाली नरेंद्रवार, आशिष कुथे, भाविका बनकर, श्रुती चंदेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.