वाशिम : दिवंगत आमदार मातोश्री मालतीबाई सरनाईक यांच्या तालीमीतून तयार झालेल्या ॲड. किरणराव सरनाईक यांनी मित्रमंडळीच्या सोबतीने चळवळीतून समाजातील दुःखितांचे अश्रू पुसून त्यांना न्याय मिळवून देण्याचे अविरत कार्य केले. त्यामुळे त्यांनी कारंजा येथून विधानसभा लढवून ते विधानसभा सदस्य व्हावी अशी भावना त्यांचे कारंजा नगरीतील मित्र संजय कडोळे, प्रदिप वानखडे, गणेशराव काळे,शिवमंगल आप्पा राऊत, गजाननराव गायकवाड हे व्यक्त करीत होते. परंतु स्वभावतः शांत,संयमी, सहनशिल विनम्र असलेल्या ॲड. किरणराव सरनाईक यांचेवर पक्षाकडून अन्याय झाल्याने काही काळ ते राजकारणापासून अलिप्त राहिले . या काळात त्यांनी स्वबळावर अमरावती विभागात शिक्षकांचे फार मोठे संघटन तयार केले शिक्षकांचे प्रश्न सोडवून त्यांचा विश्वास प्राप्त केला व अखेरीस ते स्वबळावर अमरावती विधानपरिषद आमदार झाले.दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त दरवर्षी वाशिम येथील श्री शिवाजी विद्यालय व महाविद्यालयाचे प्रांगणात त्यांचा वाढदिवस त्यांचे मित्रमंडळी साजरा करीत असतात. त्यानिमित्त कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे कलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, प्राचार्य अशोकराव उपाध्ये, नंदकिशोर माटोडे पाटील, प्रदिप वानखडे, कैलाश हांडे, उमेश अनासाने, नंदकिशोर कव्हळकर, शेषराव मेश्राम,दशरथ खडसे गुरुजी आदींनी त्यांचे अभिष्ट चिंतन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. तर आपल्या मनोगतातून संजय कडोळे आणि प्राचार्य अशोकराव उपाध्ये यांनी पुनश्च ॲड. किरणराव सरनाईक यांनी विद्यानपरिषदेची निवडणूक लढवावी. १००% आपलाच विजय होणार असल्याचे भाकित सांगितले .