आरमोरी- बजरंग दल शाखा आरमोरीच्या वतीने आरमोरी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री संजय मंडलिक यांचा नुकताच शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मंडलिक म्हणाले की,बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला केव्हाही मदत मागितल्यास त्यांना आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.आपल्या आरमोरी शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांसोबतच जनतेची सुद्धा सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनियुक्त ठाणेदार संदीप मंडलिक यांचा सत्कार करताना बजरंग दलाचे जिल्हा संयोजक शुभम इन्कणे, आरमोरी तालुका संयोजक श्रीकांत सातव, तालुका सत्संग प्रमुख प्रफुल कुकडकार, गोरक्षक प्रमुख सूरज सुरपाम,
सदस्य लकी सोनेकर, स्वप्निल वाटगुरे, लोकेश माकडे, हर्षल तागडे,मंगेश कुद्रपवार, प्रवीण दाते, तसेच आरमोरी तालुक्यातील बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.