अकोला:-
निरामय एज्युकेशन अँड मेडिकल रिसर्च फाउंडेशन द्वारा संचालित अजिंक्य कौशल्य विकास संस्था-मराठा नगर अकोला येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ अंतर्गत चालविण्यात येणारे सर्टिफिकेट कोर्स इन योगा अँड नॅचरोथेरेपी व सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिंग केअर 2023-24 बॅचचे प्रमाणात वितरण व निरोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री . चन्द्रशेखर ठोकर , श्री गजानन चोपडे, श्री अरुण राऊत प्राचार्य डॉ. योगेश पाटील सर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील बिहाडे, श्री धनंजय भगत उपस्थित होते.
प्राप्त केलेल्या आरोग्य विषयक कौशल्याचा वापर सामाजिक हीत जोपण्यासाठी करावा. असे प्रतिपादन या प्रसंगी विचार व्यक्त करतांना श्री चोपडे सर यांनी केले. श्री. धनंजय भगत व सहकाऱ्यांनी एक उत्तम कौशल्य विकास संस्था स्थापन केली आहे. संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे. शासनाचा कौशल्य विकास अधिकारी या नात्याने संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यार असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना श्री. ठोकरे साहेब यांनी केले.
शिक्षक वर्ग डॉ. चेतन भौरदकर, डॉ. राजेश बोंडे, डॉ. प्रियंका देशमुख, डॉ. नलिनी कसले, कु. निधी पोपट,
यासोबतच विद्यार्थी हर्षा मानकर, प्रदीप शुक्ला, अरविंद देठे, अश्विन दाते, वंदना बिहाडे, निलिशा पोपट,विद्या राऊत, गजानन मेथाडे, निकिता पाटील, श्री राम जांभे, उर्मिला कासवे, शुभांगी शुक्ला, कल्पेश ढोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाकरिता सानिका खापरकर ,योगेश इंगळे, भाग्यश्री दाते, सागर लोबो यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....