अकोट तालुक्यातील वणी वारुळा माहेर असलेल्या व मुजरे महमंदपुर पळसो बढे सासर असलेल्या प्रतिक्षा किशोर इंगळे ह्या विवाहितेला पती, सासु,दिर ननंद,नंदोई नेहमीच टोमणे लावायचे व म्हणायचे की तुझ्या
माहेरच्यानी हुंडा कमी दिला,व नविन चार चाकी गाडी घेण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी पैसे आण, असा तगादा लावून आणि दिवस गेल्यावर विवाहितेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला वैद्यकीय उपचार न देता, बुवाबाजी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी शुक्रवारी पती, सासू नणंद नणदोई सह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वणी वारुळा माहेर असलेल्या प्रतीक्षा कीशोर इंगळे वय २३वर्ष या विवाहितेच्या तक्रारीनुसार २०२० मध्ये किशोर पंडितराव इंगळे रा. मुजरे मोहम्मदपूर पळसो बढे यांच्यासोबत जाती रिती रिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नामध्ये विवाहितेच्या माहेरच्यांनी दोन लाख रुपये खर्च केला. लग्नानंतर काही महिने सुरळीत गेल्यानंतर सासू गुणवंतीबाई इंगळे व दीर ऋषिकेश इंगळे हे टोमणे मारायचे, प्रतिक्षा च्या पतीला तिच्याविरुद्ध भडकवून द्यायचे पती किशोर पंडित इंगळे हा दारू पिऊन आल्यावर या विवाहितेला आई आणि भाऊ , बहिण,जावाई यांच्या सांगण्यावरून मारहाण करायचा. तसेच नणंद संजीवनी गवई व नंदोई आकाश गवई, पतीची मामे बहीण मालती पांडे रा. पिंजर हेसुद्धा तिच्या पती, सासूला भडकवून द्यायचे. पती व सासरचे लोक या ना त्या कारणांमुळे छळ करायचे, मारहाण करायचे, यात विवाहितेचा गर्भपात झाला. चुलत सासरे अजाबराव इंगळे व चुलत सासू पुष्पा इंगळे, चुलत दीर संदीप अजाबराव इंगळे, प्रदीप अजाबराव इंगळे, कुलदीप अजाबराव इंगळे, सर्व रा. मुजरे मोहम्मदपूर आणि संजीवनी गवई, आकाश गवई रा. बोरगाव मंजू हे सुद्धा घरी येऊन पती, सासूला विवाहितेविषयी खोटी माहिती सांगायचे. या छडा मुळे विवाहितेची प्रकृती बिघडल्याने पती व सासूने व सासरकडील मंडळींनी तिच्यावर वैद्यकीय उपचार न करता, बुवाबाजी केली. त्यामुळे विवाहितेची प्रकृती अधिकच खालावली होती.अशा स्थीतीत पती व दिराने या विवाहितेला वडिलांच्या घरी तिला माहेरी सोडून दिले असता वडीलांनी तिच्यावर वैघकीय उपचार अकोला सह नागपूर येथील रुग्णालयात केले.व आपल्या मुलीला वाचविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले त्यामुळे आज मुलगी जिवंत असल्याचे तिचे वडील राजकुमार वानखडे सांगतात. प्रतिक्षा इंगळे हिच्या तक्रारीवरुन बोरगांव मंजु पोलीसांनी या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.