वाशिम : महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या,सर्वात मोठ्या प्रजासत्ताक भारत देशातील स्वतंत्र लोकशाही टिकविण्याकरीता, "मतदान" करण्याच्या सोईसुविधेची जबाबदारी पार पाडणे.हे प्रत्येक भारतिय मतदारांचे कर्तव्य आहे. याविषयी जनजागृती करतांना संजय कडोळे यांनी सांगीतले की, "मी तर म्हणेल की,अन्नदान, रक्तदान,देहदान यापेक्षाही जास्त महत्वाचे मतदान आहे. कारण तुमच्या मतदानामुळे आपल्या देशावर सत्ता गाजविणाऱ्याची निवड होत असते. त्यामुळे सतर्कतेने मतदान करून योग्य उमेद्वाराची निवड मतदानामधून झाली पाहिजे." देशात रहाणारे सर्वच धर्मिय,गरीब श्रीमंत,लहान मोठे,स्त्री पुरुष या प्रत्येकांना मतदान करण्याचा सम समान अधिकार संविधानाने दिलेला आहे.आणि त्यामुळे लोकशाहीत मतदान करणे म्हणजे आपल्या देशाचा, लोकशाहीचा,संविधानाचा आदर करणे होय.आपल्या एका मतामुळे लोकशाहीच्या निवडणूकीमध्ये फार फार मोठा बदल घडवून आणण्याची शक्ती असते.आपल्या मतदाना मधून आपण आपला विश्वासू लोकप्रतिनिधी निवडून देत असतो.त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून आपण लोकशाहीचे समर्थक असल्याचे सिद्ध केले पाहिजे.त्यामुळे बंधु आणि भगीनींनो,येत्या शुक्रवार दि. 26 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्येक मतदाराने स्वेच्छेने आपल्या पसंतीच्या उमेद्वाराला मतदान करून लोकशाही बळकट करावी. मतदानाचे दिवशी कुणीही बाहेरगावी जाऊ नये.तसेच मतदानाला गैरहजर राहू नये. आपण स्वतः तर मतदान करावेच पण आपल्या कुटुंबातील इतर सदस्य,भावकीतील मंडळी व नातेवाईक,शेजारी पाजारी,इष्ट मित्र मंडळी यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. अशा प्रकारे जनजागृतीपर आवाहन,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त असलेले,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रत्येक मतदारांसाठी केले आहे.त्यासोबतच आपल्या प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी सांगितले की, "आपला खासदार निवडतांना प्रत्येकांनी उमेद्वार हा आपल्या मतदार संघातीलच असला पाहीजे.त्या उमेद्वाराने भविष्यात तुम्हाला ओळखले पाहीजे.ज्या खासदाराची तुम्ही वेळ प्रसंगी संकटकाळी मदत घेऊ शकाल.व तो खासदार देखील तुमचे समाधान करू शकेल. तुमच्या हाकेला ओ देवू शकेल. तुमच्या गावात मतदार संघात लोकसभा विकास निधी आणून विकास कामे पूर्णत्वास नेऊ शकेल अशा विश्वासू व्यक्तिचीच निवड करा. अन्यथा तुमच्या मतदार संघातील विकास निधी दुसरीकडे पळवून नेण्याचीच जास्त शक्यता आहे.हे सदैव लक्षात असू द्या.कृपया अति प्रतिष्ठित म्हणजेच केवळ व्हि आय पी म्हणून मिरविणाऱ्या व्यक्तीला मतदान करू नका.अन्यथा त्याचेही दुष्परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील.तेव्हा खासदार निवडतांना इतराच्या सांगण्यावरून ते म्हणतात म्हणून किंवा कुणाच्या आमिषाला बळी पडून,कुणाच्या दबावाखाली (दहशतीखाली) येऊन त्यांची भिती बाळगून,मनाविरुद्ध मतदान करू नका." असेही त्यांनी मतदारांना सांगीतले आहे.