कारंजा (लाड) : कारंजा शहरातील शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या,स्थानिक सावित्रीबाई फुले कॉन्व्हेन्ट आणि प्राथमिक शाळेत नुकतेच,सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षणासोबतच,सामाजिक कार्याच्या दृष्टिने रक्तदान शिबीर घेण्याचा उपक्रम राबवून शाळेच्या संस्थापक अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा, राज्यस्तरिय शेतीनिष्ठ पुरस्कार तथा आंतरराष्ट्रिय पुरस्कार प्राप्त असलेल्या श्रीमती उर्मिलाताई इंगोले आणि त्यांच्या सहकारी व्यवस्थापन मंडळ तथा मुख्याध्यापक व शिक्षकांनी नवा पायंडा पाडला आहे.याबाबत शाळेकडून,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार,कारंजा नगरीतील स्थानिक माळीपुरा येथील, सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट व प्राथमिक शाळा कारंजा (लाड) येथे संस्थाध्यक्षा असलेल्या माजी नगराध्यक्षा तथा आदर्श समाजसेविका उर्मिलाताई इंगोले यांचे मार्गदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्यां सोबतच,विद्यार्थ्याचे पालक,शिक्षकवृंद आणि समाजाच्या सर्वांगीन विकासाकरीता, शिक्षण-कला-क्रिडा-नाटय इ विविध स्पर्धा,आणि उपक्रम राबविले जात असतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा आदर्श बाळगून स्वतः जातीने शाळाध्यक्षा उर्मिलाताई इंगोले ह्या प्रत्येक उपक्रमात तन मन धनाने सहभागी होत असतात.यंदा जागतिक महिला दिनानिमित्त, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती उर्मिलाबाई इंगोले मॅडम(इंगोले शिक्षण प्रसारक संस्था कारंजा) ह्या होत्या तर सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचे उपाध्यक्ष राहुल इंगोले सर,धीरजभाऊ इंगोले सर, शशिकांत वेळूकर ,सुनील काळे, मोहन पाटील, राजू बेलखेडे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक शुक्राचार्य इंगोले सर यांनी केले याप्रसंगी अकोला डायग्नोस्टिक सेंटर ब्लड सेंटर व कंपोर्नेट युनिट यांच्या विद्यमाने डॉ एस एस स्वामी,डॉ सुनील इंगोले,श्रद्धा भाले,अपेक्षा काळे, राजू जामकर,अरुण चुनडे व तसेच शाळेचे उपाध्यक्ष राहुल इंगोले सर यांनी प्रेक्षकांना मार्गदर्शन केले व रक्तदान करण्यात प्रोत्साहन करण्यात आले. याप्रसंगी अनेक महिला पुरुष मंडळीनी रक्तदान केले . याप्रसंगी जागतिक महिलादिन औचित्य साधून सावित्रीबाई फुले शाळेमध्ये, संघर्षामधून आपले आयुष्य घडविणाऱ्या ३५ महिलांचा सत्कार माजी नगराध्यक्ष व शाळेच्या संचालिका श्रीमती उर्मिलाताई इंगोले यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे,आंतरराष्ट्रिय पर्यावरण संस्थेच्या अमरावती विभाग प्रमुख सीमाताई अजित सातपुते यांनी दिग्दर्शित केलेली आणि अमरावती विभाग अध्यक्ष सौ शारदाताई भुयार यांनी प्रमुख भूमिका असलेली "म्हातारपण हे आल्यावरी अशी ही दैना" ही समाजमनावर गांभिर्याने प्रभाव टाकणारी नाटीका सादर केली. या नाटीकेत वृद्ध महिलेची भुमिका देवकाताई लुलेकर यांनी तर सुनबाईचे पात्र अनिताताई राऊत यांनी उत्तम प्रकारे वढवीले तर प्रमिलाताई अंबाळकर, सुचिताताई बाजारे , छायाताई गावंडे , अरुणाताई राजगुरे यांनी अतिशय उत्कृष्ट भूमिका सादर करून सर्वांची मने जिंकली . शिवाय पर्यावरणप्रेमी महिलांनी रक्तदान देऊन सामाजिक बांधिलकी दर्शविली,

यामध्ये अमरावती विभाग मार्गदरर्शिका, सौ कृपाताई ठाकरे, यमुनाबाई राठोड यांचे सहकार्य लाभले तसेच उपस्थित पदाधिकारी सौ शुभांगीताई जैन मॅडम सौ अन्नपूर्णा वनारसे मॅडम, ज्योतीताई मेहेंकार, ज्योतीताई सेंधवकर, पुष्पाताई दहातोंडे, अमरावती विभाग संप्रदाय अध्यक्ष वाशिम जिल्हा सौ शीलाताई चिवरकर यांनी पर्यावरण वर मार्गदर्शन करून वृक्ष लागवड व संवर्धन माहिती दिली. शेवटी सर्वांना सावित्रीबाई फुले प्राथ.शाळकडून राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व रक्तदान प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार शाळाध्यापक नितेश गव्हाणे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....