कारंजा (लाड) : संपूर्ण देशभरच नव्हे तर विश्वभरातील,ब्रम्हाकुमारीज केन्द्रावर,प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या माऊंट आबू स्थित मुख्यालयाच्या मुख्यप्रशासीका दादी ब्र.कु. प्रकाशमणीजी यांचे पुण्यस्मरण "विश्व बंधुता दिन" म्हणून साजरे होत असतांनाच,कारंजा (लाड) येथील अतिप्राचिन असलेल्या, ब्रम्हाकुमारीज केन्द्रावर देखील केन्द्र संचालिका राजयोगीनी ब्र. कु.मालती दीदी यांच्या पुढाकारातून,दि.२२ ते २५ पर्यंत विश्व बंधुता दिनाचे कार्यक्रम घेण्यात आले.त्यांच्या मार्गदर्शनाने राजयोगीनी दादी प्रकाशमणीजी यांचे पुण्यस्मरण रक्तदानाच्या कार्यक्रमाद्वारे साजरे करण्यात आले.सर्वप्रथम राजयोगोनी ब्र.कु.मालती दीदी यांनी दिपप्रज्वलन व दादीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण केले.नियमीत मुरली,योगा घेण्यात आला.त्यानंतर बाबांना भोग लावून,ब्रम्हाकुमारीज परिवाराला ब्रम्हाभोज देण्यात आले.यावेळी राजयोगीनी ब्र.कु.मालती दीदी यांनी सर्व रक्तदाता भाई बहन यांना प्रमाणपत्र व बाबाची सौगात देवून सत्कार केला. तर ब्र.कु मालती दीदी यांना कुमूदिनी शिरभाते बहन यांनी सौगात देवून त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. याप्रसंगी ब्र.कु.नयना बहन, ब्र.कु. रिना बहन, ब्र.कु. आरती दीदी,ब्र.कु. मंदा बहन,ब्र.कु.आशा बहन ,ब्र.कु. छाया बहन,ब्र.कु. शोभा बहन,ब्र.कु.स्वामिनी बहन ,ब्र.कु. रंजना बहन, ब्र .कु. निर्मला बहन, ब्र.कु. उर्मिला बहन, प्रमिला बहन, ब्र.कु. कुसूम बहन,ब्र.कु. नंदा बहन,ब्रम्हकुमार डॉ.निखिल भाई, ब्र.कु. प्रविण भाई, ब्र.कु. प्रदिप भाई, ब्र.कु. केशवराव भाई, ब्र.कु. लोमेश भाई, संजय भाई कडोळे, ब्र. कु. विश्वनाथ भाई, ब्र.कु. दिलीप भाई ताठे ब्र.कु. अभिजीत भाई ब्र.कु गजानन भाई इत्यादी उपस्थित ब्रम्हकुमारी परिवाराचे भाईबहन यांनी दादीजी यांना अभिवादन केले.असे वृत्त ब्र.कु. प्रदिपभाई वानखडे यांनी कळवीले असल्याचे वृत्त ब्रम्हाकुमारीज परिवारचे प्रसिद्धी प्रमुख ब्र. कु. संजय कडोळे यांनी कळवीले.