आडसाली ऊस
_आडसाली ऊस पिकास एकरी १६० किलो नत्र, ६८ किलो स्फुरद, ६८ किलो पालाश खतमात्रा शिफारशीत आहे. मात्र, ही खतमात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. माती परीक्षणामुळे जमिनीचा सामू, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती कळते. को-८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के जास्त द्यावी. ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ ह्या प्रमुख वाढीच्या अवस्था आहेत. नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांची वाढीच्या अवस्थेनुसार गरज लक्षात घेता, उसासाठी चारवेळा खते विभागून देणे आवश्यक आहे. उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. १० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी आणि मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के द्यावे. फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते, म्हणून लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता आणि १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा. उसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्नघटक जास्त प्रमाणात शोषले जातात, म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे. लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत.
सुरु ऊस,
हरभरा
_जिरायती हरभर्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा १० ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणार्या पावसाचा जिरायत हरभर्याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायती क्षेत्रात बियाण्याची खोलवर (१० सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभर्याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभर्याची पेरणी योग्य वेळी करणे गरजेचे आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपांतील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी, म्हणजे प्रति एकरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते._
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 378