अकोला :-सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध प्राचीन मनोकामनापूर्ती करणाऱ्या श्री नारायणी धाम मोठे राम मंदिर येथे श्री भादवाउत्सव निमित्त श्री राणी सती दादी मंगल पाठ आज दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी सुप्रसिद्ध गायिका व अध्यात्म क्षेत्रामध्ये समाजसेवा करणाऱ्या सौभाग्यवती निधी मंत्री यांच्या मधुर वाणी मध्ये श्री राणी सती दादी मंगल पाठ कार्यक्रम श्री नमो नारायणी तर्फे तसेच रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समिती मोठे राम मंदिर हरिअर संस्था च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. भक्तांच्या मनोकामनापूर्तीसाठी अकोला शहरातील सर्वात प्राचीन जागृत मनोकामनापूर्ती करणारी श्री राणी सती मंदिर मोठे राम मंदिर येथे असून तिलक रोड स्थित संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र भूमीमध्ये गेल्या 89 वर्षापासून रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव साजरा करण्यात येत आहे सर्व जाती धर्माचे सनातन प्रेमी नागरिकांना एकत्रित करून गोरगरिबांचा कल्याण सामाजिक दायित्व म्हणून भक्ती आणि श्रद्धा विश्वासासोबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सतत तीन पिढीपासून श्री रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव साजरा करण्यात येत आहे श्री रामदेव बाबा जन्मोत्सव चार सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी 12 वाजता पर्यंत वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने लघु रुद्र श्री रामदेव बाबा यांच्या पादुका व अकोला शहरातील सर्वात जुने रामदेव बाबा मंदिर व प्राचीन मूर्ती अभिषेक होणार आहे व संध्याकाळी सामूहिक वेगवेगळे मंडळ व भक्त भजन करून रामदेव बाबा यांचे गुणगान करणार आहे. विकी जुनून वाला , प्रेम गोयल,तसेच विद्याधर अग्रवाल बनवारीलाल बजाज, रमेश लड्डाएडवोकेट महेंद्र पुरोहित किसन गोपाल पुरोहित, गिरीश जोशी संजय अग्रवाल सागर भारुका सुमन अग्रवाल , विजय अग्रवाल, विनायक सांडील्य गुरुजी,वसंत लड्डा, त कृष्णा अग्रवाल, गिरीश सिंघानिया, ओम प्रकाश खत्री कृष्णा राठी गिरीराज तिवारी हितेश चौधरी हिम्मत चौधरी, किशोर खंडेलवाल गिरधर ठाकरे हेमंत शर्मा कुंजबिहारी जाजू सतीश गोयंका आधी पदाधिकारी उपस्थित होते.
स्वर्गीय सुरज करण जोशी, स्वर्गीय ओमप्रकाश जोशी बालकिसन बाळू शेठ चांडक स्वर्गीय सत्यनारायण बजाज स्वर्गीय हिरालाल अपूर्वा स्वर्गीय छगनलाल शर्मा, भिसे, स्वर्गीय नारायण सरकी वाले यांची परंपरा शहरात अविरतपणे सुरू आहे . सर्वात जुने मंदिर असून शहरांमध्ये आज बारा रामदेव बाबाची मंदिरे झाली आहे गीता नगर परिसरात दोन तर गंगानगर एक, मध्ये मंदिरात चा निर्माण झाला आहे बिकानेर जोधपुर नंतर अकोल्यात रामदेव बाबाचे मंदिर बारा झाली आहे ही रामदेव बाबा जागृत देवस्थानाची व मूर्तीची भक्तीची श्रद्धेची पावती आहे