कारंजा शहरातील घनकचरा हाताळणी व व्यवस्थापनाचे कामास विशेष प्राधान्य देवुन मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी डंपीग ग्राउंड रस्त्यालगतचा कचरा हटविण्याची सूचना दिली होती. त्या सूचनेनुसार कचरा रस्त्यावरील कचरा हटविण्यास सुरुवात झाली आहे.
नगर पालिकेचे कंत्राटदार पल्लवी एन्टरप्रायजेस, नांदेड यांनी नगर परिषदेचे जाम रोड वरील डंपीग ग्राउंड रस्त्यालगत कचरा टाकल्याने जागेची पाहणी करुन कंत्राटदारास सात दिवसाचे आत रस्त्यालगतचा कचरा डंपीग ग्रांऊडच्या आत मध्ये टाकण्यास व यानंतर रस्त्यालगत कचरा हटविण्या बाबा आदेश दिले होते. शहरातील घंटागाडी परिचलन, रस्ते, नाल्या सफाई, कचरा त्वरीत शहराबाहेर नेणे, पावसाळयात शहरात पाणी थांबुन नागरीकांना कोणताही त्रास होवु नये याबाबत मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशा मध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत.