कारंजा (लाड) : कारंजा वासियांचे आराध्य ग्रामदैवत दत्तावतार श्री गुरुदेव श्री.नृसिंह सरस्वती स्वामी शैल्यगमण यात्रेनिमित्त,दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी,सालाबाद प्रमाणे साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराकडून सा.करंजमहात्म्य वृत्तपत्रांचे विशेषांकाचे प्रकाशन श्री.गुरुमंदिर संस्थान कारंजा येथे करण्यात आले.यावेळी श्री. गुरुमंदिर संस्थानचे विश्वस्त श्री. निलेशभाऊ घुडे यांचे अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्रमात साप्ता.करंजमहात्म्यचे प्रकाशन करण्यात आले.या शुभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गणेश महाराज संस्थान नाशिकच्या विश्वस्त माऊली हभप.नानीताई सोमवंशी,यंदाच्या श्री गुरुमंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष विनायकजी कोडापे, विरजजी घुडे,निखिल घुडे,श्रीपाद कुलथे आदी उपस्थित होते.करंजमहात्म्य परिवारातर्फे संपादक संजय कडोळे, सहसंपादक मंडळीची उपस्थिती होती.यावेळी आपल्या प्रास्ताविकामधून संपादक संजय कडोळे म्हणाले, श्री गुरुमाऊली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि आदिशक्ती श्री कामाक्षा माता हे आमचे आराध्य दैवत असून श्री गुरुप्रसादानेच माझ्या साप्ताहिक वृत्तपत्राला "करंजमहात्म्य" हे शिर्षक मिळाले आहे.व मी गेल्या 42 वर्षापासून दरवर्षी श्री.गुरुमाऊली शैल्यगमन यात्रेनिमित्ताने श्रीचरणी माझी अल्पशी सेवा देत असतो." श्री गुरुमंदिर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निलेशजी घुडे अध्यक्षीय संभाषणामधून म्हणाले, संजय कडोळे हे केवळ आपल्या वृत्तपत्राद्वारे धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शिक्षण व सेवाव्रती सामाजिक कार्याला अग्रस्थानी ठेवून सकारात्मक पत्रकारिता करीत असल्याबद्दल आणि श्री गुरुमाऊली चरणी दरवर्षी निःस्वार्थ सेवा देत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.