कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम शहा येथील उत्साही तरुण आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, पत्रकारीतेच्या क्षेत्रात उतरला आणि गावकऱ्यांना न्याय देवू लागला.वडिल जीनवर तायडे यांना देखील पत्रकारितेची आवड होती.तीच आवड महादेव तायडे यानेही जपली.कुटुंबात जेमतेम शेती त्यामुळे वडिल अल्पभूधारक.त्यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने अखेर महादेव जीनवर तायडे याने रोजगारा करीता सरळ पुण्याला जाण्याचा मार्ग निवडला.आणि पुण्याला कंपनीमध्ये रोजगार करू लागला.रोजगाराची समस्या तर सुटली.परंतु महादेव जीनवर तायडे ह्याला गावाकडच्या गावगाड्यातील समस्या आठवू लागल्या व त्यामुळे पुण्यामधून त्याने आपल्या गावासाठी नव्हे तालुक्यातील जनसमस्या सोडविण्यासाठी आपल्यामधील पत्रकारिता जीवंत ठेवली. कारंजा येथील विविध क्षेत्रातील मंडळी त्याला आपल्या समस्या व बातम्या पाठवितात. व महादेव तायडे "पत्रकारिता व्यवसाय नसून निःस्वार्थ मानवसेवा" ह्या आपल्या स्वभावाने उत्साहाने प्रसिद्ध करून जनसामान्यांना न्याय मिळवून देतो.त्यामुळेच त्याच्या या कार्याची दखल घेवून, महादेव तायडे हे पुण्यावरून नुकतेच कारंजाला आपल्या मित्रपरिवाराच्या स्नेह भेटीसाठी आले असता स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे,विजय खंडार,प्रदिप वानखडे आदींनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.