क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात साजरी
विनोद पट्टेबहादुर :
देशभरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाशिम मध्येही सामाजिक कार्यात लोकप्रीय असलेल्या राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था, वाशिम द्वारा संचालित भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, वाशिम व मूकनायक विचार मंचच्या वतीने हर्षउल्हासात जयंती साजरी करण्यात आली. तब्बल दोन वर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे एक वेगळाच उत्साह सगळीकडे पाहायला मिळला.
महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त राजरत्न संस्थे कडुन ३१३१ लाडू व केळी तर मूकनायक विचारमंच कडुन शितपेय वाटप करण्याचा उपक्रम राबवीला गेला. स्टॉलचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु-शीष्या सारखी उंची भविष्यातही कोणी गाठू शकणार नाही कारण महात्मा ज्योतिबा फुले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल स्वराज्य हव होत. ज्या मधे समता, बंधुता, न्याय, एकात्मता अपेक्षीत होती. त्यांच स्वप्न महानायक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पूर्ण केले. चाकोरीबद्ध मांडणी करून संविधानाच्या माध्यमातून एकसंध करत न्याय, बंधुता, समानता, एकात्मता याची सांगड घालून जगातील सर्वात चागंले संविधान लिहून आपल्या गुरूला व गुरूच्या गुरूला अपेक्षित असलेलं स्वराज्य संविधानाच्या रूपाने लिहून ठेवले ज्यामुळे भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा असून सुद्धा भारत जगात वेगळेपण जपून आहे. असा गुरु व गुरुचा शिष्य पुन्हा होणे नाही त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डाॅम बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनुकरण करत वाटचाल करीत यशस्वी होण्याचा प्रयत्न व महापुरुषांच्या विचारांचा वारसा जोपासण्याची धुरा प्रत्येकाने खांद्यावर उचलली पाहिजे असे मत उद्घाटन प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती मध्ये राम शृंगारे, तालुका महिला, बाल विकास अधिकारी बी.बी. धनगर यांची उपस्थिती होती. जयंती महोत्सव यशस्वीतेसाठी फायर अॅन्ड सेफ्टीच्या विद्यार्थ्यांनी विषेश मेहनत घेतली यामध्ये पवन चव्हाण, शैलेश चव्हाण, श्री चव्हाण, धिरज इंगोले, अक्षय जाधव, राज जाधव, मेघा इंगळे यांचा समावेश होता. जयंती महोत्सवाचे आयोजन राजीव दारोकार, विकास पट्टेबहादूर, वैशाली खोब्रागडे-मेश्राम, विधी मेश्राम, सागर बदामकर, वेदांत मेश्राम, पी.एस. खंडारे, कुसुम सोनोने, निलेश भोजणे, रामकृष्ण कालापाड, अस्विनी इंगोले, महादेव बाभणे, सुनील जाधव, ज्ञानेश्वर अखंड, सचिन जाधव, संतोष गायकवाड, प्रशांत जाधव, गणेश जाधव, विनोद पट्टेबहादुर आदींनी
प्रयत्न केले.
*चौकट*
*महामानवास तूफान आतिशबाजी करुन दिली सलामी*
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था,वाशिम व्दारा संचालीत भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, वाशिम मूकनायक विचारमंचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,वाशिम तुफान आतिशबाजी करुण महामानवास सलामी देण्यात आली. तुफान आतिशबाजीने परीसर दनानुन गेल्याने भीमअनुयाया मध्ये नवचैतन्य संचारले होते.
*चौकट*
तब्बल दोन वर्षानंतर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असल्याने मोठ्या प्रमाणात उल्हासात संस्थेकडून जयंती महाउत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त ३१३१ लाडू, केळी व विचार मंचाकडून शीतपेय वाटप करण्यात आले.
*चौकट*
राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था, वाशिम द्वारा संचालित भारत व्होकेशन ट्रेनिंग कॉलेज, वाशिम व मूकनायक विचार मंचच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशीम येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दिवसभर राबवीलेल्या गेलेल्या उपक्रमाने परिसरात झालेली अस्वच्छता स्वच्छता अभियान राबवून दूर करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....