आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला,महाराज निष्ठा,राज्यकर्तव्य, शिष्टाचार,आचरण उत्तम प्रशासक यांच जिवंत उदाहरण आहे.आजच्या काळात शिवविचारांच आचरण करत राज्य कारभार करण गरजेच आहे या साठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व स्वराज्य संस्थाना राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे आदेश दिले या आदेशाचे पालन करीत बरडकिन्ही ग्रामपंचायत कार्यालयाने आज दिनांक:-६/६/२०२२ ला सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्य दिन म्हणुन साजरा करण्यात आला.
यावेळी बरडकिन्ही ग्रामंचायतीचे ग्रामसेवक एच.बी. तलांडे, सरपंच एम. डी. बन्सोड , उपसरपंच भास्कर गोटेफोडे,
ओमदेवराव ठाकरे ग्रा.पं.सदस्य, वसंत बगमारे ग्रा.पं.सदस्य , सुनीता मेश्राम ग्रा.पं.सदस्या, अनिता पाकडे ग्रा.पं.सदस्या, संदेशा गुरूनुले ग्रा.पं.सदस्या, माधुरी ढोंगे ग्रा.पं.सदस्या, सुचिता दाणी ग्रा.पं.सदस्या, ग्रामपंचयत कर्मचारी गुलाब राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब ठाकरे व इतर उपस्थित होते.
या वेळी माननीय सरपंच एम.डी.बन्सोड यांच्या हस्ते शिवराज्य भिषेक पथाकाचे पूजन करण्यात आले.