चंद्रपूर- अहेरी मार्गावरील कोठारी परिसरातील झरणजवळ एका वाहनाने बिबट्याला धडक दिली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली.बिबट्याचं शेवटचा श्वास घेताना बघून माणसं गहिवरली आहे.
या मार्गावर अनेक वन्यजीवांच्या अपघातात मृत्यू झाला आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. प्रभावी उपाययोजना करण्याची वन्यजीव प्रेमींची मागणी आहे.