कारंजा (लाड) : पोहरादेवी येथे उभारण्यात येणारे संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांचे समाधी मंदिर अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर उभे राहणार असे प्रतिपादन पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांनी केले.
आज 10 डिसेंबर रोजी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे संत रामराव महाराज मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड बोलत होते. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,बंजारा समाजाचे धर्मगुरु बाबुसिंग महाराज,जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, देविभक्त कबीरदास महाराज, शेखर महाराज,जितेंद्र महाराज,अनिल राठोड,संजय महाराज,तेलंगणाचे आमदार अनिल जाधव,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ संजय रोठे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव,पोहरादेवी सरपंच विनोद राठोड,वसंतनगर सरपंच गणेश जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री ना.संजयभाऊ राठोड म्हणाले की, पोहरादेवी येथे आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून नंगारा वास्तूसंग्रहालय हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभे करून भाविकासाठी सर्व सोयी सुविधा उभारण्यात येतील.येथे येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा देखिल निर्माण करण्यात येतील असे ते म्हणाले.
यावेळी हंसराज अहिर,शेखर महाराज,चंद्रकांत ठाकरे यांचेसह महंतांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित राठोड यांनी केले.संचालन प्रा. कैलास चव्हाण यांनी केले तर आभार संजय महाराज यांनी मानले. कार्यक्रमाला बंजारा समाज बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे वृत्त महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....