वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील, बहुआयामी पत्रकार संजय कडोळे यांनी, नागपूर येथे विदर्भस्तरीय पत्रकार अधिवेशनात आलेल्या संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषद मोहगाव ( गडचिरोली )च्या, "गोंडवाना गौरव सन्मान प्राप्त" अध्यक्ष देवसायब आतला आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बातचित करीत, झाडीपट्टी तसेच नक्षलग्रस्त भागात राहूनही ते करीत असलेल्या विविध समाजसेवी उपक्रमांची माहिती जाणून घेतली . त्यांचा पेहराव धोती - कुर्ता - मुंडासे त्यावर मोरपंखी तुरा . व्यवसाय शेतीमधून भात उत्पादन ,जंगल जमीनीतून मिळणाऱ्या नैसर्गीक जडीबुटी . त्यांचे शस्त्र तिरकमान . त्यांचे दैवत ग्रामदैवत . त्यांचे आराध्य बिरसा मुंडा . त्यांचे मनोरंजन लोकनृत्य गोंधळ, भिंगीसोंग, डहाका, खडीगंमत असल्याचे त्यांनी सांगितले . मनोरंजनाकरीता रात्ररात्रभर दंढार, झाडीपट्टी बोली भाषेतील लोकनाटय . प्रसंगी आम्ही विनाशस्त्राने वाघाशी झुंज देत असल्याचे सांगताना, वन्यप्राणी आमचे सखे सोबती असल्याचे सुद्धा त्यांनी स्वाभिमानाने सांगीतले तसेच यावेळी साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांचेशी बातचित करतांना आजही आमचा बहुतांश समाज जंगलातच विखुरलेल्या छोट्या छोटया वस्त्यामध्ये १००% लाकडी झोपडयांमध्ये राहतो . आणि अशिक्षिततेचे प्रमाण जास्त आहे . शासनाच्या सोई सवलतींपासून वंचित असल्याचे सांगीतले .