कारंजा : स्थानिक कारंजा शहरातील जिजामाता चौक येथे सालाबादप्रमाणे यंदाही जिजामाता मित्र मंडळ कारंजा कडून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब आणि युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्त जिजामाता चौक कारंजा येथे मित्रमंडळा कडून जिजाऊ आऊसाहेबांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करण्यात येवून संपूर्ण दिवसभर शौर्य गीते व पोवाड्याच्या ध्वनिफिती वाजत होत्या.तर सायंकाळी मित्रमंडळाच्या जिजाऊभक्तांनी एकत्र येवून सामुहिक जिजाऊ वंदना केली.यावेळी कारंजाचे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, डॉ. अजय कांत,माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर, नितीनजी गढवाले,कुंदन जुमळे, प्रशांत डहाके,शुभम झोपाटे, देशपांडे बंधू,पत्रकार संजय कडोळे,चंदु खोना,मेघराज जुमळे व शेकडो जिजाऊ भक्तांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रध्दासुमने वाहीली.