कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): कारंजा हे शहर हे आजूबाजूच्या चारही जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेले एकमेव शहर असून,आजूबाजूच्या सर्वच जिल्ह्यामध्ये कारंजा येथील नागरिकाचे व्यवहार असल्यामुळे त्यांचा प्रवास होत असतो.शिवाय कारंजामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून दररोज हजारोंच्या संख्येने जैन धर्मिय अनुयायी आणि श्रीगुरूदत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे उपासकांची कारंजा शहरात मांदियाळी दिसून येत असते. परंतु या प्रत्येक जिल्ह्यामधून रात्रीला येणाऱ्या करीता कोणतीच सुविधा नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.त्यामुळे कारंजा आगाराकडूनच जर दररोज सायंकाळी 05:30 ते 06: 00 च्या दरम्यान,एक एक प्रवाशी बस अकोला-अमरावती-वाशिम-यवतमाळ येथे जर सोडता आली. आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून दररोज रात्री 09:00 वाजता कारंजा करीता या बसेसची फेरी कारंजा आगारा मार्फत जर सुरु करता आली.तर आपले सर्व व्यवहार आटोपून परत कारंजाला येणाऱ्या,प्रवाशी नागरिकांची आपल्या गावी व आपल्या घरी परत येण्याची व्यवस्था होईल. तसेच या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या कारंजा आगाराचेही उत्पन्न वाढवीता येईल.आणि कारंजा येथे येणाऱ्या प्रवाशांची सुद्धा गैरसोय टाळता येईल.आधी सुरु असणाऱ्या इतर आगाराच्या रातराणी गाड्यांच्या बससेवा बंद करण्यात आल्याने कारंजा येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे, तसेच यातही महत्वाचे म्हणजे न्यायालयीन कामकाज व महत्वाच्या कामाने गेलेल्या कारंजा येथील सर्वसामान्य प्रवाशांची फारच गैरसोय होत असून, त्यांचेकडे आजूबाजूच्या जिल्ह्यातून रात्री कारंजा येथे परतायला कोणतेही दुसरे साधन उपलब्ध नाही.त्यामुळे आमदार राजेंद्र पाटणी यांनी स्वतः कारंजा मानोराच्या नागरीकांकरीता पुढाकार घेऊन,अकोला येथील विभागीय नियंत्रक आणि विभागीय व्यवस्थापक यांचेशी प्रत्यक्ष चर्चा करून,कारंजेकर नागरिकांची रातराणी बसफेरीची मागणी पूर्ण करून घ्यावी अशी मागणी कारंजा येथील प्रवाशांच्या वतीने,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.तसेच महत्वाचे म्हणजे कारंजातील सर्वच नगरिकांची नाळ अकोला जिल्ह्याशी कायमच जुळलेली आहे.अकोला हा जुना जिल्हा आहे.तसेच आजही बहुतांश शासकिय कार्यालये अकोला येथे असून,येथील जवळपास सर्वच रग्नांना उपचाराकरीता अकोला येथे धाव घ्यावी लागते.तसेच अकोला जिल्हयात कारंजेकरांचे नातेवाईक असल्याने त्यांचे अकोला येणे जाणे सुरूच असते. शिवाय संपूर्ण भारतामध्ये रेल्वे प्रवास करण्याकरीता कारंजा पासून,जवळचे रेल्वे स्टेशन म्हणून मुर्तिजापूर ओळखले जाते.त्यामुळे या रेल्वे स्टेशनवर उतरून तिर्थक्षेत्र कारंजा येथे अनेक जैनधर्मिय अनुयायी आणि श्री नृसिह सरस्वती स्वामींचे श्रीदत्त उपासक भाविक भक्त तसेच पर्यटक मुर्तिजापूराहून कारंजाला येणे जाणे करीत असतात.त्यामुळे मुर्तिजापुरातून कारंजा करीता स्पेशल बससेवा असणे अत्यावश्यक असतांना,या मार्गावर स्पेशल बस नाही.या मार्गाने फक्त अकोल्यावरून -मुर्तिजापूर मार्गाने-कारंजा यवतमाळकडे,जाणाऱ्याच बस उपलब्ध असतातआणि त्यामध्ये प्रवाशांना मुर्तिजापूरवरून बसण्याकरीता जागाच मिळत नाही.त्यामुळे या प्रवाशांच्या महत्वाच्या मागणीची,माननिय आमदार राजेन्द्र पाटणी यांनी दखल घेऊन,अकोला विभागाचे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांचे मार्फत, "दररोज आणि दर तासाला,कारंजा आगाराकडून, सकाळी 07:00 ते रात्री 09:00 पर्यंतदर तासाला फक्त,कारंजा ते मुर्तिजापूर आणि मुर्तिजापूर ते कारंजा येणेजाणे (फेऱ्या) करणाऱ्या कमितकमी दोन बसेसची सोय करून द्यावी.अशी मागणी,कारंजेकर नागरिक आणि प्रवाशांच्या वतीने, प्रसिद्धी पत्रकाद्वारे,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.