स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या राष्ट्रीयकृत सामाजिक संस्थेच्या वतीने टेलिव्हिजन फेम गायिका श्रुती भांडे हीची संगीत मैफिल दि. १ मार्च २०२२ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या जागतिक मंचावर संपन्न झाली.कार्यक्रमाच्या प्रारंभी दिव्यांगांचे प्रेरणा स्थान डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला नवोदित कलावंतांना जागतिक मंच देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणून टेलिव्हिजन फेम गायिका श्रुती भांडे हीची सुगम संगीताची मैफिल फेसबुक लाईव्ह द्वारे संपूर्ण विश्वात एकाच वेळी प्रसारित करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संगीत अभ्यास मंडळ, अमरावती विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ.कौमोदी बर्डे यांनी केली. जय शारदे वागेश्वरी या गीताने श्रुती भांडे यांनी मैफिल सुरू केली. चित्रपट व सुगम संगीतातील विविध गितासह हार्मोनिका वादनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. निवेदिका अनामिका देशपांडे व गायिका श्रुती भांडे यांच्या संवादाने कार्यक्रमात रंग भरला.
सदर कार्यक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विवीध प्रश्नांना समाजा समोर मांडण्यात आले. श्री रविप्रकाश भांडे यांनी संस्थेचे सदस्यत्व स्वीकारले, डॉ कौमोदि बर्डे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या आणि संस्थापक अध्यक्ष प्रा. विशाल कोरडे यांनी गायिका श्रुती भांडे यांना संस्थेचे स्मृती चिन्ह देऊन सम्मानित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रसाद झाडे, श्रीकांत कोरडे, अनिरुध्द देशपांडे, अर्पिता काळकोंडे , मेघा देशपांडे, मानसी काळकोंडे व दर्शना रत्नपारखी, यांनी सहकार्य केले .