कारंजा : कारंजा शहरात आपल्या पारदर्शी व्यवहाराने व्यापारी वर्गात लोकप्रिय ठरलेल्या सर्वात जुन्या असलेल्या - श्री गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय यापूर्वी महेश भवन समोर होते. आता मात्र सदर्हु श्री गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था कार्यालय शहरातील मध्य वस्तीत असलेल्या काण्णव जीन परिसरात, महाराष्ट्र विद्युत वितरण कार्यालया समोर स्वतःच्या इमारतीमध्ये हलविण्यात आलेले आहे.
या प्रसंगी स्थानांतर सोहळ्याला प्रामुख्याने पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा, प्रकाशजी गोलेच्छा, पारसजी गोलेच्छा, चेतनजी गोलेच्छा, विनितजी गोलेच्छा, महेन्द्र लोढाया, किरीट रायचुरा, डॉ . संपट, बिपीन वाणी, शंकरलाल कश्यप, नांदेडकर ताई, राजुभाऊ घोडे, सौ चंदाताई कोळकर, चंद्रकांत शिंदे, राजु गाढवे, घनश्यामदास केसवानी तसेचे पतसंस्थेचे कर्तव्यदक्ष व्यवस्थापक अतुल धाकतोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी कारंजेकर व्यापारी, पतसंस्थेचे ग्राहक आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संस्थेला भेट देऊन अध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा तथा व्यवस्थापक अतुल धाकतोड यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात .

महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषदेतर्फे संजय कडोळे, रोहीत महाजन, विजय खंडार यांनी पुष्पगुच्छ आणि कारंजाचे आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती श्री कामाक्षा देवीची प्रतिमा देवून संस्थाध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा यांचा सत्कार केला. संपूर्ण दिवसभर इतरही कार्यकर्ते भेटी देत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता व्यवस्थापक अतुल धाकतोड यांचेसह चंद्रकांत भोपाळे, साहेबराव वाकोडे, संदिप बेलबागकर, राजेन्द्र हळदे, जटाळे मॅडम, राजेन्द्र श्यामसुंदर, मोहम्मद नझर आदींनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....