कारंजा (लाड) : "वाढती महागाई लक्षात घेऊन सांस्कृतिक विभागाकडून वयोवृद्ध कलावंताना मिळणाऱ्या मानधनात वाढ करून सर्वांना दरमहा सरसकट पाच हजार रुपये मानधन करण्यात यावे. त्याकरीता उपराजधानी नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून, कलावंताचे मानधन वाढवूनच घ्या. ह्या मागणी करीता,जिल्ह्यातील लोककलावंताची नावलौकिक प्राप्त एकमेव संघटना असलेल्या -विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत तथा संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे व कार्यकर्त्यांनी, नुकतीच वाशिम येथे, अमरावती विधान परिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार अँड किरणराव सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. कलावंताच्या मानधन वाढी सोबतच, गेल्या पाच वर्षापासून जिल्हा वृद्ध साहित्यीक व कलाकार मानधन लाभार्थी निवड समिती नसल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून शासनाकडूनच कलाकारावर अन्याय होत असल्यामुळे जिल्हा वृद्ध कलावंत निवड समितीचे पालकमंत्र्या कडून त्वरीत गठण करावे. मानधन जिल्हा निवड समितीवर केवळ लोककलावंतानाच अशासकिय सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात यावी. आदी विषयावरही संजय कडोळे यांनी शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक यांचेशी चर्चा केली.तसेच चर्चेच्या प्रारंभी पुष्पगुच्छ देऊन शिक्षक आमदार सरनाईक यांना हिवाळी अधिवेशात लोककलांवताच्या मागण्या उपस्थित करण्याकरीता शुभेच्छा दिल्यात.यावेळी वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार (पत्रकार) हे प्रामुख्याने चर्चेला उपस्थित होते.