कारंजा...येथील नव्या न्यायालयीन इमारतीला काल महाराष्ट्र शासनाच्या वतीने (59 कोटी 79 लाख 59 हजार रुपये )
59 79.59 कोटी रुपये ईतक्या अंदाजीत खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिल्याची
अधिघोषणा येताच कारंजा वकील संघामध्ये आनंद व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले कारंजा तालुका वकील संघाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात येऊन आज दि 4 ऑक्टोंबर रोजी नव्या प्रशासकीय इमारतीस मंजुरी प्रदान झाल्याबद्दल कारंजा न्यायालयामध्ये मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ( विधी व न्याय विभाग ) देवेंद्रजी फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर नंतर कारंजा येथील इमारतीस प्राधान्याने अग्रक्रम देत तत्परतेने या कामास मंजुरी प्रदान केल्याने भविष्यात कारंजा येथील या इमारतीमध्ये एकाच ठिकाणी दिवाणी वरिष्ठ न्यायालय, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी कनिष्ठ न्यायालय हे एकाच छताखाली येणार आहेत या सुविधेमुळे येथील वकील मंडळी व पक्षकारांना बाहेर गावी जाऊन पैसा वेळ व श्रम यांचा अपव्यय यापुढे होणार नाही आज दि 4 रोजी वकील संघाच्या दालनात या निर्णयाच्या स्वागतार्थ घेण्यात आलेल्या कारंजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष एड. निलेश पाटील कानकीरड यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मिठाई वाटप करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ आर डी देशपांडे, सरकारी अभियोक्ता, नीरज सबरदडे सहाय्यक सरकारी वकील एड.चव्हाण ऍड. अरुण खंडागळे,यांनी कारंजा वकील संघाने आजवर घेतलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व अथक परिश्रमामुळे या कामास गती येऊन मुहूर्तपेढ झालेली आहे असे विचार व्यक्त केले. वकील संघाचे अध्यक्ष एड.निलेश पाटील यांनी सर्वांचे सहकार्य दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या बैठकीला
,एड दिलीप वाडेकर ऍड.सुभान खेतीवाले सौ.बोरकर ऍड सौ. रामटेके एड सौ.माधुरी राऊत ऍड मिलिंद खंडारे ऍड अनिता राठोड,ऍड शीतल कानकीरड ,ऍड.राहुल मनवर ऍड अनिल पवार, ऍड सावळे ऍड.दिलीप राठोड ऍड श्रीकांत चौधरी ऍड कु वासनिक ऍड. अठोर, ऍड.सौ डोळस ऍड. सागर वासनिक,ऍड. कानतोडे ऍड. मिलिंद खंडारे, ऍड. अनिल पवार, ऍड. चौधरी , ऍड..धम्मानद देवळे ऍड गणेश गुजर ऍड. मेश्राम, ऍड. खान ऍड. धनंजय डाखोरे, ऍड. मोहाडे आदी ची उपस्थिती होती..