कारंजा(लाड) : :विद्या भारती शैक्षणिक मंडळ,अमरावती द्वारा संचालित विद्या भारती कनिष्ठ महाविद्यालय, कारंजा (लाड) यांनी सन २०२५ च्या उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेत आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा यशस्वीपणे कायम राखली आहे. कला शाखेचा निकाल ९४.२३ टक्के लागला असून कु. सानिया आर. ठोके हिने ८८.६७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर स्वप्नील व्ही. पाटील (८३.००%) व कु. आरती कानडे (८१.१७%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून गौरव प्राप्त केला. वाणिज्य शाखेचा निकाल ९८ टक्के असून कु. तनुजा एस. कोपरकर (८८.१७%), कु. भावना एस. जांगिड (८७.६७%) व उत्कर्षा एस. राय (८७.१७%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.८७ टक्के लागला असून या शाखेत कु. यशस्वी व्ही. वाघमारे हिने ८८.८३% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. संस्कृती डब्ल्यू. लसणकर (८१.३३%) व अभिषेक मडके (७६.००%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. कनिष्ठ महाविद्यालयाचा( कला वाणिज्य व विज्ञान) निकाल ९७ ३८% लागला असून महाविद्यालयामधून प्रथम कु. यशस्वी विलास वाघमारे, द्वितीय कु. सानिया रमेश ठोके व तृतीय कु. तनुजा संजय कोपरकर या विद्यार्थिनींनी क्रमांक मिळवून गौरव प्राप्त केला. एम.सी.व्ही.सी. विभागाचा निकाल ७१.६६% लागला आहे. या सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे कारंजा (लाड) येथील महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा आणखी बळकट झाला आहे.
या घवघवीत यशाबद्दल विद्या भारती शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष मा.रावसाहेब शेखावत, सचिव डॉ. ए. डी. चौहान व प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील (विद्या भारती कनिष्ठ महाविद्यालय, कारंजा लाड) यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व पर्यवेक्षक प्रा. ललित खरड, प्रा. विभा लाहोटी, प्रा. ज्ञानदेव अघम, प्रा. मिलिंद ब्राह्मणे, प्रा. विनय लोढा व डॉ. राजा गोरे तसेच इतर सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हे यश हे महाविद्यालयातील शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत यांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. या निकालामुळे कारंजा (लाड) शहरात समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले.