कारंजा (लाड) : धार्मिक व आध्यात्मिकते करीता आपले सर्वस्व अर्पूण,संपूर्ण आयुष्य काकडा,हरिपाठ,भजन,भारूड,गवळण,भवाणीचा गोंधळ, खंडोबाचे जागरणामध्ये खर्ची घालणाऱ्या,भजनसम्राज्ञी विदर्भ भूषण श्रीमती कांताबाई सुदाम लोखंडे ह्या कारंजा तालुक्यातील सोमठाणा जवळच असलेल्या मु.दिघी पो. उंबर्डा बाजार येथील रहिवाशी असून,गेल्या तिस पस्तिस वर्षापासून दरवर्षी कांताबाई सुदाम लोखंडे ह्या नित्यनेमाने श्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी वारी पायदळ करतात.त्यांचे गावात विठ्ठल रखमाई मंदिर आणि श्री. चंदनशेष महाराजांचे मंदिर असून त्यांनी आपल्या गावात सर्वजाती धर्माच्या महिलांचे यशस्वी संगठन करून, "महर्षी वाल्मिकी महिला हरिपाठ भजनी मंडळ", दिघी येथे स्थापन केले आहे.कारंजा येथील शहर पोलीस स्टेशन आवारातील संत गजानन महाराज मंदिर कारंजाच्या प्रगट दिनानिमित्त होणाऱ्या पालखी शोभायात्रा नगर परिक्रमेत त्यांचे मंडळ गेल्या तिस वर्षापासून अखंड सेवा देत आहे.त्याचे सर्वस्वी श्रेय कांताबाई सुदाम लोखंडे यांनाच जाते.कांताबाई सुदाम लोखंडे ह्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या संस्थापक मंडळातील,प्रतिभावान महिला लोककलावंत असून,सध्या त्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या महिला सांस्कृतिक विभागाच्या तालुकाध्यक्षा असून त्यांच्या नेतृत्वात संघटनेने लोककलावंताच्या विविध मागण्यांसाठी शासनाविरुद्ध अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत.अशा यशस्वी महिला लोककलाकार कांताबाई सुदाम लोखंडे ह्या वृद्धापकाळी हलाखीचे जीवन जगत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून,त्यांचा लहान मुलगा पोलीओमुळे १००% दिव्यांग आहे.त्यामुळे इसन २०१७ पासून त्या शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन मिळावे म्हणून दरवर्षी प्रस्ताव सादर करीत होत्या. परंतु हेतुपूरस्परपणे दरवर्षी ह्या गरजू महिला लोक कलाकाराला डावलण्यात येत होते. शेवटी संजय कडोळे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सलग दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणही केले.अखेर २०२४ मध्ये शासनाने त्यांच्या प्रस्तावाला मानधन लाभार्थी म्हणून मंजूरात दिली. त्यामुळे वृद्धापकाळी आपला पोटापाण्याचा प्रश्न मिटलेला असून कांताबाई सुदाम लोखंडे यांनी डोळ्यात आनंदाश्रू व्यक्त करीत,ह्याचे सर्वस्वी श्रेय जिल्ह्यातील ज्येष्ठ लोककलावंत आणि जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीचे माजी अशासकिय सदस्य तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना दिले आहे. तसेच संजय कडोळे यांनीच आम्हाला ह्या प्रवाहात आणून योग्य मार्गदर्शन केल्यामुळे यापुढे मरेपर्यंत मला शासनाचे मानधन दरमहा मिळणार असल्याचे सांगून त्यांचे आभार व्यक्त केले आहे.