दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला( वर्ष 16 वे ) परंतु या वर्षी या हनुमान जयंतीच्या पर्वावर "एक सामाजिक कार्यक्रम ," म्हणून सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थांन मंडळ ओमशांती नगर च्या वतीने विविध विभागात कार्यरत असणाऱ्या" सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार समारंभ" घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये बत्तीस दाम्पत्याचा शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता उदघाटक माननीय रिताताई दीपक उराडे नगराध्यक्षा नगरपालिका ब्रम्हपुरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्रजी मातेरे विभागीय अधिकारी सि डी सि सि ब्रह्मपुरी, प्रमुख अतिथी भाऊरावजी राऊत सेवानिवृत्त मुख्यध्यापक ,कृषक विद्यालय चौगांन, मनोज वठे नगरसेवक ब्रम्हपुरी, सौ. पुष्पाताई गराडे नगरसेविका व सर्व संसथापक सदशय सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान मंडळ ओमशांती नगर ब्रम्हपुरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोदजी तुपट, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर ढोरे तर आभार प्रदर्शन डाकराम ठाकरे यांनी केले या कार्यक्रमाकरिता सर्व संस्थापक सदशयाचे सहकार्य लाभले व कार्यक्रमानंतर लगेच सर्वांनी महाप्रसादाचे सेवन करू न कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.